लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : संततधार पावसामुळे कसुरा नदीला पूर आल्याने परभणी आणि पाथरी शहराशी संपर्क तूटला. दरम्यान जोरदार पावसामुळे वालूर आणि शिंदे टाकळी मार्गही ठप्प झाल्याने अनेक गावांचा सेलू शहराशी संपर्क तुटला.शनिवारी दिवसभर पावसाची रिमझिम होती. परंतू रविवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने कसुरा नदी दुथडी भरून वाहू लागली. सायंकाळी ढेंगळी पिंपळगाव येथील पुलावरून पाणी वहात होते.परिणामी सेलू- परभणी मार्ग बंद झाला. सेलू- पाथरी रस्त्यावरील कुंडी पाटीजवळील कसुरा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने पाथरी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे पाथरी आणि परभणी या दोन शहराशी सेलूचा संपर्क उशिरापर्यंंत तुटला होता. सेलू- शिंदे टाकळी आणि सेलू- वालूर रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. शहराच्या मधोमध वाहणाºया नाल्याला पूर आल्याने झाकीर हुसेन नगर, हेमंतनगर, लक्कडकोड, शिवाजीनगर येथील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. आठवडी बाजारातील नाल्याच्या पुरामुळे जुन्या शहरातील नागरिकांचा संपर्क तुटला होता.
सेलू तालुक्यात कसुरा नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:05 IST