लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बालाजीच्या रथाच्या साक्षीने शहरवासीयांनी सीमोल्लंघन केल्यानंतर रविवारी दुसºया दिवशी सायंकाळपर्यंत भाविक कर्णपुरा यात्रेत येत होते. नवरात्रोत्सव संपला, देवी निद्रिस्त झाली तरी भाविक दर्शन घेताना दिसून आले. या भाविकांसाठी यात्रेत काही दुकाने, हॉटेल सुरू होत्या तर काही दुकानांमधील खेळणी काढण्याचे काम सुरू होते. मागील १० दिवसांत ९ कोटींची उलाढाल यात्रेत झाल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.कर्णपुरा यात्रेला २१ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने सुरुवात झाली. या यात्रेत लहान-मोठी १ हजार तात्पुरती दुकाने थाटण्यात आली होती, तसेच आकाशपाळणे, ब्रेकडान्स झुला, टोराटोरा असे खेळणीचे प्रकारही होते.कटलरी, पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ, देवीचे वस्त्र आदींचे स्टॉलही येथे होते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिक विखुरल्या गेले होते. पण दुसºया दिवशीपासून यात्रेत दररोज लाखो भाविक येत होते.दसरा संपला तरीही आज रविवारी सकाळपासून नागरिक कर्णपुरा यात्रेत येत होते. देवीचे दर्शन घेत होते. तसेच विविध सामानही खरेदी करताना दिसून आले. हॉटेलमध्येही दुपारी गर्दी दिसून आली. यंदा व्यापाºयांचा व्यवसायही चांगला राहिला. या यात्रेत महाराष्ट्रासह आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतून व्यावसायिक आले होते. प्रत्येकाकडे १० ते ५० लाखांपर्यंतचा माल होता. नवरात्रोत्सवात ९ कोटींपेक्षा अधिकची उलाढाल या यात्रेत झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
कर्णपुरा यात्रेत ९ कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:32 IST