कन्नड/फुलंब्री : आॅक्टोबर हीट आणि निवडणुकीमुळे तापलेल्या वातावरणात गुरुवारी दुपारी शहरात अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी पडल्या. फुलंब्री परिसरातही पाऊस झाला. याचा फायदा पिकांना होईल.हवेतील उष्मा कमी होण्यास पावसाने मदत केली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने रोहिणी नक्षत्रात होणाऱ्या पावसाची सर्वांनाच आठवण झाली. ग्रामीण भागात हा पाऊस कापूस, ऊस पिकांसाठी लाभदायक असला तरी, उशिरा झालेला पाऊस पंधरा दिवस अगोदर पडला असता, तर मका पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरले असते.भराडी परिसरात पिकांना दिलासा; तर मका पिकाचे नुकसानभराडी : गुरुवारी रात्री भराडीसह परिसरातील गावांमध्ये विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. उशिरा पेरणी केलेल्या कापूस पिकाला यामुळे दिलासा मिळाला असला तरी मका पीक अनेक ठिकाणी आडवे झाले. मका पीक ऐन मोसमात असताना पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी मक्याचे उत्पन्न घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने कपाशी, तूर, मिरची या पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी अजूनही मोठ्या पावसाची बळीराजाला प्रतीक्षा आहे.
कन्नड, सिल्लोड, फुलंब्री तालुक्यात हलक्या सरी!
By admin | Updated: October 17, 2014 23:56 IST