शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कंधार-लोह्यात मनसेतील गटबाजी शिगेला

By admin | Updated: August 28, 2014 00:00 IST

मनसेमधील दोन गटात झालेल्या कंधार शहरातील राड्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे़

कंधार: लोहा विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथीला वेग आला आहे़ निवडणुका तोंडावर आल्याने मोर्चेबांधणी केली जात आहे़ परंतु मनसेमधील दोन गटात झालेल्या कंधार शहरातील राड्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे़कंधार-लोह्यात माजी आ़रोहिदास चव्हाण व शिवा नरंगले यांच्यात सुप्त गटबाजी धूमसत होती़ पक्ष एक पण गटबाजी सतत उघड व्हायला लागली़ रास्ता रोको, मोर्चा हे सुद्धा गटनिहाय निघाले़ त्यामुळे दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन होऊ लागले़ लोहा ऩप़ निवडणुकीत माजी आ़ चव्हाण यांनी बाजी मारली़ राज्यात मनसेची स्वबळावरील ऩप़ सत्ता चर्चेत आली़ त्यामुळे चव्हाण यांना मनसेचे उपाध्यक्ष करण्यात आले़ दुसरीकडे शिवा नरंगले यांना बढती देण्यात आली़ जिल्हाप्रमुख करण्यात आले़ परंतु लोहा विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर काढण्यात कोणतीही कसर ठेवली नाही़ माजी आ़ रोहिदास चव्हाणांच्या मनसे आगमनानंतर पक्षाला मोठी बळकटी आली़ परंतु गटबाजीने पक्ष पोखरल्याचे वारंवार दिसले़रोहिदास चव्हाण सलग दोन वेळा कंधार-लोह्याचे आमदार झाले़ राजकारणापेक्षा समाजकारण अधिक अशी त्यांची स्वतंत्र ओळख आहे़ आगामी विधानसभा निवडणुकीची त्यांनी जोरदार तयार केली आहे़ मराठवाड्यात कन्नडनंतर लोहा मतदारसंघात मनसेचा झेंडा फडकावण्यासाठी चव्हाण प्रयत्नात आहेत़ परंतु गटबाजीचा मोठा अडथळा त्यांना पार करण्याचे आव्हान आहे़विद्यमान आ़शंकरअण्णा धोंडगे मतदारसंघाच्या विकासाची चर्चा करत आहेत़ माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर हे भगवा खांद्यावर घेवून गावोगाव फिरत आहेत़ चिखलीकरांनाही प्रा़मनोहर धोंडेंचा अडथळा आहे़ अ‍ॅड़मुक्तेश्वर धोंडगे आ़पंकजा केंद्रे यांच्या सभेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत़ त्याचवेळी मनसेमध्ये दोन गटातील विसंवाद समोर आला असून शहरातील महाराणा प्रताप चौकात मोठा राडा झाला़ (वार्ताहर)