शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कानडा वो विठ्ठलू करनाटकू येणे मज लावियेला वेधू़़़

By admin | Updated: July 3, 2017 00:35 IST

नांदेड : पावसाची रिमझिम अन् पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजातील भक्तीगीत, भावगीत आणि प्रेमगीतांच्या मैफीलीत रसिक ओलेचिंब झाले़

श्रीनिवास भोसले । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पावसाची रिमझिम अन् पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजातील भक्तीगीत, भावगीत आणि प्रेमगीतांच्या मैफीलीत रसिक ओलेचिंब झाले़ त्यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केलेल्या कानडा वो विठ्ठलू करनाटकू येणे मज लावियेला वेधू़़़ या गाण्याने नांदेडकर भक्तीरसात तल्लीन झाले़ आषाढी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी वैशाली सामंत यांचा संगीतरजनी हा कार्यक्रम पार पडला. मराठी भाषेसह बंगाली, गुजराथी, भोजपुरी, आसामी, तमिळ, तेलगू भाषांतून दोन हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या सामंत यांनी नांदेडकरांच्या प्रतिसादाचे कौतुक केले़ ऐका दाजिबा़़़ या गीताने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या वैशाली सामंत यांनी आजच्या संगीत मैफलीची सुरूवात गुरूवाणीने केली़ एक ओंकाऱ़़़या स्वरांचा आवाज परिसरात घुमताच टाळ्यांचा कडकडाट झाला़ पारंपरिक संगीताचा बाज घेऊन लोकप्रिय झालेल्या अनेक गाण्यांचा गायनाचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडत वैशाली सामंत यांनी आपल्या सुरेल आणि दमदार आवाजाने नांदेडकर रसिकांना जिंकले़ ही गुलाबी हवा़़़ वेड लावी जीवा़़़ या गाण्यावर अख्या सभागृहाने ठेका धरला़ गृहराज्य मंत्री दीपक केसरकर हे सभागृहातून निघाले असतांना वैशाली सामंत यांनी त्यांना विनंती करून थांबविले आणि आपल्या दमदार आवाजातील एकविका आई तु डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी़़़ हे गीत ऐकविले़ या गाण्याने सभागृहामध्ये उत्साह वाढला़ यानंतर हर्षीत अभिराज यांनी संगीतबद्ध केलेले अन् ना़ धो़ं महानोर यांनी लिहिलेले दूरच्या राणात केळीच्या बनात हे गीत सादर केले़ रेश्माच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला़़़ ही शांता शेळके यांनी लिहिलेली लावणी गावून टाळ्या अन् शिट्या साथ मिळविली़ दरम्यान, संगीत रजनीचे उद्घाटन गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले़ यावेळी आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, आ़ सुनील शिंदे, आयोजक आ़हेमंत पाटील, शंकुतला अहिरराव, धोंडू पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक मिना उपस्थित होते़