शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक नागपंचमीला ‘कलगीतुरा’ रंगला; हर्सूलमध्ये १५० वर्षांची परंपरा टिकून

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 22, 2023 19:39 IST

मागील १५० वर्षांपासून हर्सूलमध्ये नागपंचमीला कलगीतुरा रंगत असतो.

छत्रपती संभाजीनगर : ‘मै धोंडे का महिना कहे तो सूनो कविराया, वह धोंडा है कोन किसी को पता मूल पाया,’ असे कलगीतुरेवाल्यांनी गाण्यातून प्रश्न केला आणि तुरेवाल्या म्हणाले की, ‘धोंडे का छंद गाते करते बढाई, आज मैफील मै धोंडे का जवाब सूनो भाई’... असा सवाल, जवाबचा ‘कलगीतुरा’ नागपंचमीच्या निमित्ताने हर्सूलमध्ये ६ तास रंगला... यासाठी पंचक्रोशीतील ३०० पेक्षा अधिक नागरिक जमा झाले होते.

या कलगीतुऱ्यात हिंदूंसोबतमुस्लीम भाईही सहभागी झाले होते. ही काही आजची परंपरा नसून मागील १५० वर्षांपासून हर्सूलमध्ये नागपंचमीला कलगीतुरा रंगत असतो. शहरात समावेश होऊनही हर्सूलकरांनी व आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी आपली ग्रामीण संस्कृती जपून ठेवली आहे. याचे ‘कलगीतुरा’ हे एक उत्तम उदाहरण होय.

हर्सूलच नव्हे तर चिमणपीरवाडी, गोलवाडी, हर्सूल-सावंगी, बेगमपुरा, चिकलठाणा, मुकुंदवाडी, पळशी, बिडकीन आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पश्चिम बाजूला असलेल्या गल्लीत सकाळी ११ वाजता कलगीतुऱ्याला सुरुवात झाली. सर्वप्रथम सर्वांना मानाचा ‘फेटा’ बांधण्यात आला. आणि सुरू झाले टाळ व ढोलकीच्या ठेक्यावर गाणे. महाभारत, रामायण, पुराणकथा आदींचा संदर्भ घेऊन प्रश्न विचारले जात होते आणि त्यास तेवढ्याच तोडीने उत्तरही दिले जात होते. यात कलगीवाल्यांकडून टेकचंद वाणी, हिरामन वस्ताद (हर्सूल) यांनी प्रश्न विचारले तर ‘तुरेवाल्याकडून माहदू बागडे (जटवाडा), रामकिशन वस्ताद (चिमनपीरवाडी), गंगाराम वाणी (पडेगाव) यांनी उत्तरे दिली. त्यांना हरिभाऊ खंडागळे यांनी साथ दिली. यशस्वितेसाठी पूनम बमणे, रूपचंद गुंजाळ, रूपचंद हरणे, बाबू गुंजाळ, हरिदास हरणे आदींनी परिश्रम घेतले.

सुरुवातीला मुस्लीम बांधवांनी जपली परंपराहर्सूलमध्ये १५० वर्षांपासून नागपंचमीला कलगीतुरा आयोजित केला जातो. ही परंपरा हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक बनली आहे. सुरुवातीला अजीत बाबा पटेल, गुलाम पटेल, शेख अमीर, शेख नुरखान यांनीही मौखिक परंपरा कायम ठेवली. काव्यातून त्यांच्या नावाचा आजही उल्लेख होतो. ‘शहाअली नुरखान छंद लिखते तुरेवाले शर्माते‘ असा उल्लेख कलगीतुऱ्यात आजही करतात.- फकीरचंद हरणे, आयोजक समिती

चंपाषष्ठीला साताऱ्यात एकत्र येतात सर्व कलगीतुरेवालेजिल्ह्यात आजघडीला २० पेक्षा अधिक कलगीतुरा पथक कार्यरत आहेत. वर्षभर विविध गावात कलगीतुऱ्याचे कार्यक्रम होत असतात. पण हे सर्वजण सातारा खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीच्या निमित्ताने दरवर्षी एकत्र येत असतात. तो दिवस या कलगीतुरेवाल्यांसाठी मोठा वार्षिक उत्सवच असतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHinduहिंदूMuslimमुस्लीम