शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कलासागरला मिळाली राष्ट्रीय ओळख, संस्थेच्या आवरणासह संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्या योगदानावर टपाल तिकीट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 05:51 IST

औरंगाबाद -सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था क लासागरला टपाल खात्याकडून राष्टÑीय ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने संस्थेचे आवरण जारी करताना ...

औरंगाबाद -सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था क लासागरला टपाल खात्याकडून राष्टÑीय ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने संस्थेचे आवरण जारी करताना संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले आहे. गुरुवारी एका शानदार कार्यक्रमात तिकिटाचे प्रकाशन क रण्यात आले.कलेची उपासना क रणाऱ्या कलाकारांना मागील २७ वर्षांपासून एक भव्य व्यासपीठ देण्याचे श्रेय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांना जाते व त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त या विशेष आवरणाची संकल्पना कलासागरच्या २०१८ च्या कार्यकारिणीने मांडली व भारतीय टपाल खात्याने ती उचलून धरली. त्याचबरोबर टपाल खात्याद्वारे माय स्टॅम्पनामक जारी करण्यात येत असलेल्या टपाल तिकिटांच्याशृंखलेत आशू दर्डा यांच्या चित्राचे माय स्टॅम्पही प्रकाशित करण्यात आले. या सर्वांचे फिलाटेलिक क्षेत्रात मोठेमहत्त्व आहे.गुरुवारी येथे कलासागरच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात तिकिटाचे प्रकाशन क रण्यात आले. यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कलासागरचे अध्यक्ष राजेश भारुका, सचिव विशाल लदनिया, कोषाध्यक्ष गुरप्रीत सिंह बग्गा, प्रोजेक्ट चेअरमन मनीष पारेख व उद्योगपती सीताराम अग्रवाल उपस्थित होते. लोकमत समूहाचे संस्थापक संपादक , ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्यावरील टपाल तिकि टानंतर सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठीलोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्यावर टपाल तिकीट जारी होत आहे, हे येथेविशेष उल्लेखनीय.कलासागरवर मी जेवढे प्रेम केले, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आपण मला दिले. आज या टपाल तिकिटाच्या प्रकाशनाच्या माध्यमातूनकलासागरचेनाव संपूर्ण देशात अमर झालेआहे. −आशू दर्डा, संस्थापक अध्यक्ष, कलासागर२७ वर्षांचेयोगदान : औरंगाबादमध्ये कलासागरची स्थापना २७ वर्षांपूर्वी झाली. मराठवाड्यातील एका उदयोन्मुख शहराला देशाच्या सांस्कृतिक घडामोडींशी जोडण्याचा संस्थेचा उद्देश होता. छोट्या शहरातील मोठ्या सुरुवातीनंतर प्रारंभिक संघर्षानंतर संस्थेनेअनेक शिखरे गाठली. देशातील ज्येष्ठ कलाकार आशा भोसलेयांच्यापासून श्रेया घोषाल, जगजित सिंह यांच्यापासून सोनू निगम,हेमा मालिनीपासून मल्लिका साराभाई, शबाना आजमीपासून अनुपम खेरपर्यंत अनेक कलाकारांनी क लासागरच्या व्यासपीठावर क ला सादर केलेली आहे.टपाल खात्याचेम्हणणे आहेकी, हे विशेष आवरण जगभरातील टपाल तिकाट संग्राहकांच्या संग्रहात विशेष स्थान प्राप्त करील वदेश−विदेशातील वेगवेगळ्या टपाल तिकिटांच्या फि लाटेलिक प्रदर्शनांतही पाहण्यास मिळेल. टपाल खात्याने कलासागरची निवड एकूण १२ विविध अर्जांमधून केली असून, औरंगाबाद शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत