शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कलारंगच्या ‘काव्यधारा’: तू पत्र जाळल्यावर मी राख झालो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 19:33 IST

प्रेमाचा कायम ‘अनुशेष’ राहिलेल्या तरुणांच्या दु:खापासून ते पोराबाळांसाठी मरमर करणार्‍या आई-बापाच्या उतारवयातील यातना मांडणार्‍या कवितांचा शहरवासीयांनी अस्सल साहित्यानंद लुटला.

औरंगाबाद : प्रेमाचा कायम ‘अनुशेष’ राहिलेल्या तरुणांच्या दु:खापासून ते पोराबाळांसाठी मरमर करणार्‍या आई-बापाच्या उतारवयातील यातना मांडणार्‍या कवितांचा शहरवासीयांनी अस्सल साहित्यानंद लुटला. निमित्त होते कलारंग सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित ‘काव्यधारा’ या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे.

तापडिया नाट्यमंदिरात मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.२६) पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील नऊ निमंत्रित कवींनी सहभाग नोंदविला.  खालापूरच्या विशाल उशिरेने ‘बाप’ नावाच्या कवितेतून घामात अश्रू लपविणार्‍या बापाची कहाणी मांडत सुरवात केली.   बापावर लिहायचे राहून गेल्याची सल व्यक्त करताना तो म्हणतो, ‘आमचे मळे फुलवले, पण तुझे शिवार करपले.’ पोराबाळांसाठी कायमच तोट्यात जाणारा बाप मोठा व्यापारी, या शब्दांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. बेळगावच्या पूजा भडांगे हिने ‘पानाच्या अंगावरती शहारलेला काटा गं’ कविता सादर केली.

रायगडचा युवा गझलकार बंडू अंधेरेने प्रिया प्रकाश वॉरियरचा संदर्भ देत सुरुवात केली, ‘तिच्या रोखून नजरेला नजर, मी चाललो होतो, तिने मारला डोळा, मी लाजलो होतो.’ यावर तरुण रसिकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहाचा ‘माहोल’च ढवळला . प्रेमवीरांना ‘ठेवू नको इतका विश्वास पापण्यावर’ असा सल्ला देताना तो म्हणाला, ‘तू पत्र जाळल्यावर मी राख झालो.’  प्रेमात ‘कमनशिबी’ ठरलेल्यांचे दु:ख शब्दांत कैद करीत कोल्हापूरचा उमेश सुतार म्हणाला की, ‘तुझ्या आठवणी छळत नाही मला, तुझ्या आठवणींना मीच छळतो.’ ‘तोवर प्रेम करीन’ या कवितेत तो म्हणतो, ‘माझ्या प्रेमाची बँक सतत बुडीत आहे, सव्याज परतफेड करेपर्यंत प्रेम करीन मी, काळजाचे ठोके नाराज होईपर्यंत प्रेम करीन मी.’

तसेच मुंबईची यामिनी दळवी, यवतमाळची स्नेहा ढोल, अंबाजोगाईचा अविनाश भारती, हिंगोलीचा ध. सू. जाधव आणि स्थानिक कवी नीलेश चव्हाण यांनीही कविता सादर केल्या. निवेदक नीलेश चव्हाणने नीरव मोदीपासून ‘पकोड्या’पर्यंत कोपरखळ्या मारत सर्वांना खळखळून हसविले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद