भोगाव : जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले कलंदर बाबांचा संदल ६ जून रोजी उत्साहात काढण्यात आला़येथील कलंदर बाबांचे एकाच ठिकाणी मंदिर व पवित्र दर्गा स्थळ आहे़ त्यामुळे देशात धार्मिक सहनशिलतेचे उदाहरण म्हणता येईल़ ६ जून रोजी दुपारी कलंदर बाबा यांचा संदल ऊंट, घोडे, वाद्याच्या सहभागाने पं़ स़ सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या निवासस्थानापासून निघाला़ कलंदर बाबा यांच्या पवित्र दर्गा स्थळापर्यंत मिरवणुकीद्वारे संदल काढण्यात आला़ या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ संदलनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़ रात्री ९़३० वाजता इंदोर येथील खालीद हुसेन, साबरी इप्तेकारी यांचा कव्वालीचा बहारदार कार्यक्रम पार पडला़ यशस्वीतेसाठी शिवाजीराव देशमुख मित्रमंडळ, सरपंच कृष्णा देशमुख, दर्गाचे मुतवल्ली बालाजी देशमुख आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
कलंदर बाबांचा संदल उत्साहात
By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST