शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

‘कलाग्राम’ उजळले

By admin | Updated: October 17, 2016 01:16 IST

औरंगाबाद : प्रतिभावंत हस्तकलाकारांच्या कलेने ‘कलाग्राम’ उजळले. चित्रकारांनी रेखाटलेल्या विविध चित्रांनी सारे भारावून गेले होते.

औरंगाबाद : प्रतिभावंत हस्तकलाकारांच्या कलेने ‘कलाग्राम’ उजळले. चित्रकारांनी रेखाटलेल्या विविध चित्रांनी सारे भारावून गेले होते. काही चित्रकार चित्र काढण्यात एवढे तल्लीन झाले होते की, त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. हस्तकलेच्या चाहत्यांसाठी येथील प्रदर्शन पर्वणीच ठरले. वेरूळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त ‘कलाग्राम’ मध्ये भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात हस्तकलाकारांची मांदियाळीच भरली आहे. प्रत्येक स्टॉलवर मांडण्यात आलेल्या कलाकृतीतून त्या कलाकाराच्या प्रतिभेची चुणूक दिसून येत आहे. आज रविवार असल्याने अनेकांनी आवर्जून या कलाग्रामला भेट दिली. प्रत्येक कलाकाराची कल्पकता, चित्र रेखाटण्याची शैली वेगवेगळी होती. समाज, निसर्ग, ऐतिहासिक वास्तूंकडे पाहण्याचा चित्रकारांचा दृष्टिकोन चित्रातून बघण्यास मिळत होता. सोमवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. कलाग्राममधील स्टॉलमध्ये एक स्टॉल असा आहे जिकडे पाहावे तिकडे व्यंगचित्रच आपणास पाहण्यास मिळत आहेत. बहुतांश व्यंगचित्रातून सामाजिक विषय हाताळण्यात आले आहेत. या व्यंगचित्रातून नेमकेपणे समाजाच्या मर्मावर बोट ठेवण्यात आले आहे. व्यंगचित्रकार जी. ए. बारसकर यांनी ही व्यंगचित्रे काढली आहेत. अनेक चित्रप्रेमी या स्टॉलला भेट दिली.बांगड्या, त्यावर ज्वेलरी डिझाईन कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिक कलाग्राममध्ये बघण्यास मिळत आहे. लाखेच्या बांगड्या तयार करणारा मणियार परिवार येथे आपणास हे प्रात्यक्षिक दाखवत आहे. तरुणी व महिला वर्गात येथे ‘मस्तानी कड’ प्रिय झाले आहे. या मस्तानी कडावर स्टोन, मोती कसे लावले जातात हे नसीमबानू मणियार या दाखवत आहेत. चित्रकारांवर वेरूळ-अजिंठा लेणीतील शिल्पांचा किती प्रभाव आहे ते कलाग्राममधील चित्र पाहिल्यावर लक्षात येते. चित्रकार नंदकुमार जोगदंडे यांनीही लेणीतील शिल्प चित्रात साकारले आहेत. काही चित्र ‘निराकार’ आहेत. या निराकार चित्रातून त्यांनी बराच काही ‘अर्थ’ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हेच त्यांच्या चित्राचे वैशिष्ट्ये ठरत आहे. कलाग्राममध्ये कलाप्रेमींना मधुबन पेंटिंग बघण्यास मिळत आहे. मधुबन शैलीतील चित्र काढणारे चित्रकार राज्यात कमीच आहेत. त्यातील एक तृप्ती कटनेश्वरकर या आहेत. त्यांनी स्वत: रेखाटलेल्या मधुबन पेंटिंग या प्रदर्शनात मांडल्या आहेत. मधुबनी सूक्ष्म चित्र काढताना चित्रकारामध्ये खूप संयम असायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.