शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

काकासाहेबाच्या भावाला दिली तीन किलोमिटर अंतरावर नोकरी; धार्मिक विधि झाल्यानंतर होणार रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 19:07 IST

मराठा आरक्षणासाठी कायगाव टोक येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबियाला आधार देण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे काकासाहेबचा भाऊ अविनाश शिंदे याला कानडगावपासून तिन किलोमिटर अंतरावर असलेल्या ढोरेगाव येथे नोकरी अविनाश हा भावाचे सर्व धार्मीक विधि झाल्यानंतर रुजू होणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यालयातुन देण्यात आली.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी कायगाव टोक येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबियाला आधार देण्यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. काकासाहेबचा भाऊ अविनाश शिंदे याला कानडगावपासून तिन किलोमिटर अंतरावर असलेल्या ढोरेगाव येथील ‘मशिप्रमं’च्या  शाळेत लिपिक पदाची नोकरी दिली आहे. अविनाश हा भावाचे सर्व धार्मीक विधि झाल्यानंतर रुजू होणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यालयातुन देण्यात आली.

मराठा आरक्षणासाठी कायगाव टोक येथील गोदावरी पात्रात केलेल्या जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला. या मृत्युनंतर राज्यभरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. याचवेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनात पहिला बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे याच्या कुटुंबियाला ५० लाखाची मदत, कुटुंबातील एकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याची मागणी केली होती. जिल्हाप्रशासनाने शासकीय नोकरीसह आर्थिक मदत देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर काकासाहेबाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. या घटनेला दोन दिवस होताच मराठवाड्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या ‘मशिप्र’ मंडळाने काकासाहेबाच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचा निर्णय घेतला.

यानुसार काकासाहेबाच्या गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या ढोरेगाव येथील शाळेत अविनाश यास ‘लिपिक’ पदाची नोकरी देण्यात आली आहे. ‘मशिप्र’ मंडळाचे सचिव आ. सतीश चव्हाण यांनी कानडगाव येथे काकासाहेबाच्या कुटुंबियाची भेट घेत सविस्तर चर्चा केली. यानंतर कुटुंबियाना नोकरी स्विकारण्यास होकार दर्शविला असून, काकासाहेबाचे धार्मिक विधि झाल्यानंतर शाळेत रूजू होण्यास सांगितले.

सरकारकडे मागितली विशेष परवानगीराज्यात नोकरी भरतीवर बंदी असल्यामुळे कोणत्याही संस्थेला रिक्त जागा भरता येत नाहीत. मात्र विशेष बाब म्हणून अविनाश याच्या एका पदाला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव ‘मशिप्र’ मंडळातर्फे शिक्षण विभागामार्फत मंत्रालयात पाठविण्यात आला असल्याचेही कार्यालयातुन सांगण्यात आले.

कर्तव्य पार पाडले एका कुटुंबातील कमावता तरुण पोराचा दुर्दैवी मृत्यु होतो. अशा वेळी त्या कुटुंबाला मदत करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. यानुसार मंडळाने कुटुंबातील एका व्यक्तीला तात्काळ नोकरीवर घेण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून मान्यता येईपर्यंत संबंधित पदाचा पगार मंडळातर्फे केला जाईल. तसेच या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यास मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांनी होकार दर्शविला आहे.- आ.सतीश चव्हाण, सरचिटणीस, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ