शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: June 27, 2017 00:26 IST

नांदेड : शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांना प्रोत्साहन अनुदानावर समाधान मानावे लागणार आहे़ ही एकप्रकारे या शेतकऱ्यांची थट्टाच आहे़

श्रीनिवास भोसले । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात आजघडीला अडीच लाख शेतकऱ्यांवर दीड हजार कोटींचे कर्ज आहे़ त्यात ६६ हजार ८१० चालू बाकीदार, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांना प्रोत्साहन अनुदानावर समाधान मानावे लागणार आहे़ ही एकप्रकारे या शेतकऱ्यांची थट्टाच आहे़ अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा मागील चार वर्षांतील दुष्काळामुळे होरपळून निघाला़ त्यातच पेरणी आणि शेतीशी संबंधी उद्योगांसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढू लागल्याने हतबल झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली़ दरम्यान, वाढत्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी होत असलेली होरपळ पाहून विरोधी पक्षांसह शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटून धरला़ यातच तत्त्वत: कर्जमाफी आणि आता सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे़ शासनाच्या सरसकट कर्जमाफी, तत्त्वत: आणि प्रोत्साहन अनुदान यामुळे बहुतांश शेतकरी गोंधळून गेले आहेत़ घोषणा होऊन चार दिवस उलटले असले तरी नियम आणि अटी यासंदर्भात बँका अथवा संबंधित यंत्रणेकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही़ जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी कर्जबाजारी आहेत़ जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने काढलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील ५० हजार ६५९ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा फायदा होईल़ तर कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या ६६ हजार ८१० शेतकऱ्यांना कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रूपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येणार आहे़ दरम्यान, आपण नियमितपणे कर्ज परतफेड करून घाई केल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण झाली आहे़ गावपातळीवर राष्ट्रीयीकृत बँका असो वा जिल्हा मध्यवर्ती बँका येथील अधिकारी - कर्मचारी आणि गावातील विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव शेतकऱ्यांना थेट ओळखतात़ बँकांचे कर्जवसुलीचे उद्दिष्ट तसेच सचिवांच्या पगारी यासाठी संबंधितांकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावण्यात येतो़ त्यामुळे बहुतांश शेतकरी उसनवारी करून कर्जाचे हप्ते भरतात़ परत कर्ज घेवून उसने घेतलेल्या पैशाची परतफेड करतात़ बँक अधिकारी, सेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांचे संबंध बिघडू नये म्हणून शेतकऱ्यांनी केलेला खटाटोप असतो़ परंतु, शासनाने प्रामाणिकपणे नियमित परतफेड करणाऱ्या चालू बाकीदारांना सरसकट कर्जमाफीपासून दूर ठेवल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे़ मराठवाड्यात शेतकरी संपाची सुरूवात अर्धापूर तालुक्यातून झाली होती़ सरसकट कर्जमाफीतून चालू बाकीदारांना न्याय मिळत नसल्याची भावना ठेवून पुन्हा अर्धापूर येथील शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत़