हिंगोली : शहराजवळील एमआयडीसी भागात रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास राधा जिनिंग अॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीला आग लागली. या आगीमध्ये यंत्रसामुग्री, कापूस व गाठी जळाल्याने अंदाजे २० लाखाचे नुकसान झाले आहे.एमआयडीसीमध्ये अशोक द्वारकादास मुंदडा यांच्या मालकीची राधा जिनिंग व प्रेसिंग आहे. रविवारी रात्री त्या ठिकाणी काम सुरू असताना अचानक कापसासोबत गारगोटी जाऊन मशीनमध्ये फुटल्यानंतर ठिणगी पडून कापसाला आग लागली. ही बाब लक्षात येताच कामगारांनी जिनिंगच्या आवारातील उपलब्ध पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंबही मागविण्यात आला होता. रात्रीची वेळ असल्याने आणि आग चोहोबाजूने पसरल्याने ती विझविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह जिनिंगच्या कामगारांना यश आले. आगीत कापसावर प्रक्रियेसाठी जिनिंगमध्ये बसविलेली यंत्रसामुग्री जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच जिनिंगमध्ये साठविलेला कापूस व तयार केलेल्या गाठी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून एकुण अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती जिनिंगचे मालक अशोक मुंदडा यांनी दिली. हिंगोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, पोलिस निरीक्षक दिलीप थोंबळ, सपोउपनि एन. आर. राठोड, पोना शेख शकील यांनी नुकसानीची पाहणी केली. याबाबत हनुमानदास मुंदडा यांच्या माहितीवरून ग्रामीण ठाण्यात नोंद झाली.(प्रतिनिधी)यंत्रसामुग्री भस्मसातहिंगोली येथील एमआयडीसीमध्ये अशोक द्वारकादास मुंदडा यांच्या मालकीची राधा जिनिंग व प्रेसिंग आहे. रविवारी रात्री त्या ठिकाणी काम सुरू असताना अचानक आग लागली. कामगारांनी जिनिंगच्या आवारातील उपलब्ध पाणी टाकून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
जिनिंगला आग; २५ लाखांची हानी
By admin | Updated: June 24, 2014 00:06 IST