शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘जेट’च्या सकाळच्या विमानाचे उड्डाण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:31 IST

६ एप्रिलपासून नवे वेळापत्रक

औरंगाबाद : जेट एअरवेजच्या सकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानाचे ३१ मार्चपासून पुन्हा उड्डाण सुरू होणार होते; परंतु या विमानाचे उड्डाण लांबणीवर पडले असून, आता ६ एप्रिलपासून हे विमान सुरू होईल, अशी माहिती जेट एअरवेज आणि चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई या दोन्ही विमानांचे उड्डाण सध्या बंद आहे. जेट एअरवेजने प्रारंभी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी येणारे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पाठोपाठ २३ मार्चपासून सकाळचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानही रद्द के ले. हे विमान पुन्हा कधी उड्डाण घेणार, याविषयी अनिश्चितता व्यक्त होत होती; परंतु अखेर सकाळच्या विमानाचे ३१ मार्चपासून उड्डाणाचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

चिकलठाणा विमानतळावरून फक्त ट्रू जेट आणि एअर इंडियाच्या विमानांचे उड्डाण सुरू आहे. जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाल्याने औरंगाबादहून मुंबईसाठी एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय उरला आहे. त्यामुळे मुंबईचा हवाई प्रवास महागल्याचा अनुभवही प्रवाशांना येत आहे. जेट एअरवेजचे सकाळचे विमान आता ३१ मार्चऐवजी ६ एप्रिलपासून उड्डाण घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही दिवस या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

५ एप्रिलपर्यंत रद्द जेट एअरवेजचे सकाळच्या वेळेतील मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान ५ एप्रिलपर्यंत रद्द राहणार आहे, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली, तर आॅपरेशनल कारणांमुळे सकाळच्या विमानाचे ३१ मार्चऐवजी आता ६ एप्रिलपासून उड्डाण सुरू होईल.बुकिंग केलेल्या प्रवाशांना रिफंड देण्यात येत आहे. सायंकाळच्या विमानाच्या उड्डाणाविषयी काही निर्णय झालेला नाही, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेजAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन