शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

१५ नोव्हेंबरपासून मिळणार ‘जायकवाडी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:54 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़ जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासून सुरू होतो़ मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासून सुरू होतो़ मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो़पाथरी उपविभागात बोरगाव, पाथरी, गुंज, बाभळगाव-४, बाभळगाव-५, हादगाव, केकरजवळा या सात शाखा आहेत़ जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २०१० साली पाणी सोडण्यात आले होते़ त्यानंतर पूर्ण क्षमतेने जायकवाडी धरण न भरल्यामुळे या भागातील सिंचनही खंडीत झाले होते़ सात वर्षानंतर जायकवाडी धरण पहिल्यांदाच १०० टक्के भरले आहे़ यामुळे या भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ जायकवाडी धरण पाण्याच्या आवर्तनासंदर्भात औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात २६ आॅक्टोबर रोजी परभणी, जालना आणि औरंगाबाद विभागातील अधिकाºयांची बैठक झाली़ यामध्ये जिल्ह्यात लागणाºया पाण्याचा आढावा घेण्यात आला़ कालवा समितीच्या निर्णयानंतर पाणी सोडण्यासाठीचे जाहीर प्रगटन काढले जाणार आहे़यावर्षी गोदावरी नदीपात्रातील पाथरी तालुक्यातील दोन्ही बंधारे तुडूंब भरले आहेत़ त्याचबरोबर जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकºयांनी पिकांचे नियोजन सुरू केले आहे़रबी हंगामातील गहू, ज्वारी आणि खरीप हंगामातील कापूस, तूर याबरोबरच उसासाठीही नियोजन सुरू आहे़ पाथरी उपविभागात १० हजार हेक्टर क्षेत्र पाणी पाळी सिंचनाखाली येणार असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़