शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण भरले काठोकाठ; पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग घटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 18:07 IST

पाण्याची आवक कमी झाल्याने ८ दरवाजे उघडून पाणी सोडले

ठळक मुद्देगोदावरीपात्रात केला विसर्ग 

पैठण : जायकवाडी धरण काठोकाठ भरत आले असताना पाण्याची आवक वाढल्यामुळे रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणाचे चार दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलून गोदापात्रात विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर रविवारी रात्री ११ ते २ वाजेच्या सुमारास धरणाचे आणखी १२ दरवाजे उघडून १०४८० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला.  दरम्यान, आवक कमी झाल्याने सोमवारी टप्प्याटप्प्याने ८ दरवाजे बंद करण्यात आले. सोमवारी रात्री धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलून गोदावरी पात्रात ४१९६ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.

जायकवाडी धरणाचा जलसाठा सोमवारी सायंकाळी ९९.७८ टक्के झाला होता. धरणात ७७८१ क्युसेकने पाणी येत होते, तर धरणातून विविध मार्गाने ७७८१ एवढाच विसर्ग करण्यात येत होता. आवक व विसर्ग एकच ठेवण्यात येत असल्याने धरणात ९९.७८% जलसाठा कायम राहील, असे धोरण सध्यातरी जायकवाडी प्रशासनाने निश्चित केले असल्याचे समोर आले आहे.

जायकवाडी धरणाचे चार दरवाजे रविवारी सायंकाळी ६ वाजता अर्ध्या फुटाने वर उचलून गोदावरी पात्रात २०९७ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला. यानंतर रात्री ११ वाजता पुन्हा आठ दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग ६२८८ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. परत रात्री १२ वाजता आणखी दोन दरवाजातून विसर्ग करण्यात आला. यानंतरही रविवारी रात्री धरणात येणारी आवक वाढत राहिल्याने पुन्हा रात्री २ वाजता  आणखी दोन दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला. रविवारी रात्री २ वाजेपर्यंत जायकवाडी धरणाच्या १६ दरवाजातून ८३८४ क्युसेक असा विसर्ग सुरू होता.

सोमवारी पहाटे धरणात येणारी आवक पुन्हा वाढल्याने पहाटे  ५ वाजता १० व २७ क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या फुटावरून एक फूट वर उचलून विसर्ग ९४३२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. परत सकाळी ६ वाजता १६ व २१ या दरवाजातून विसर्ग वाढवून तो १०४८० करण्यात आला.सोमवारी सकाळी ९ वाजेनंतर धरणात येणारी आवक घटल्याने १० वाजता जे चार दरवाजे एक फुटाने उचलण्यात आले होते, ते पुन्हा अर्धा फूट करून विसर्ग घटविण्यात आला. दुपारी १२ वाजता चार दरवाजे, एक वाजता पुन्हा २ दरवाजे व सायंकाळी ५ वाजता दोन असे एकूण आठ दरवाजे बंद करण्यात आले.जायकवाडी धरणात १०० टक्के जलसाठा राखण्याचे आमचे नियोजन असून, त्या दृष्टीने येणारी आवक व धरणातून होणारा विसर्ग यावर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. दरम्यान, धरण १००% भरले असल्याने  कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, रमेश चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधणे यांचे पथक जायकवाडी धरणावर करडी नजर ठेवून आहेत.  

पात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सोमवारी रात्री धरणाच्या आठ दरवाजातून ४१९२ क्युसेक क्षमतेने तर जलविद्युत प्रकल्पातून १५८९ क्युसेक असा मिळून गोदावरीपात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सुरू होता. याचप्रमाणे उजवा कालवा ७०० व डावा कालवा १३०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.४१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी आज दुपारनंतर १५२१.९६ फूट कायम राहिली, तर जलसाठा ९९.७८% कायम होता. धरणात २९०४.९६ दलघमी जलसाठा झाला असून, यापैकी २१६६.१५९ दलघमी जिवंत जलसाठा आहे. धरणात ७७८१ क्युसेक क्षमतेने आवक व धरणातून सर्व मार्गाने तेवढाच विसर्ग सुरू होता.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबाद