शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जायकवाडी धरण @ ७५ % ; नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडीसाठी पुन्हा मोठा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 19:17 IST

Jayakwadi Dam News : जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा या तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असल्याने मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत गेली.

ठळक मुद्देगुरुवारी होणार मोठी आवक

पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोटक्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसाने नाथसागरात १७९३७ क्युसेस अशी आवक सुरू असताना बुधवारी दुपारनंतर नाशिक जिल्ह्यातील धरणसमुहातून गोदावरीत विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. दरम्यान बुधवारी रात्री धरणाचा जलसाठा @ ७५ % झाला होता. धरणात येणारा येवा लक्षात घेता  धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद, व अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा या तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असल्याने मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत गेली. दरम्यान, बुधवारी सकाळी १७९३७ क्युसेस अशा मोठ्या क्षमतेने नाथसागरात पाणी दाखल होत होते.  नाशिक जिल्ह्यातून पुन्हा मोठा विसर्ग.. दरम्यान बुधवारी नाशिक जिल्ह्याला  जोरदार पावसाने झोडपून काढल्याने तेथील धरण समुहापैकी दारणा २७०८ क्युसेस, गंगापूर ८१२९ क्युसेस, गौतमी ७५० क्युसेस, व  कडवा धरणातून ४२४ क्युसेस असा विसर्ग दुपारी करण्यात आला. 

सायंकाळी ५ वा नांदूरमधमेश्वर धरणातून मात्र १४२३४ असा मोठा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला. यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाने कळविले आहे. यामुळे जायकवाडी धरणात मोठी आवक होऊन जलसाठ्यात वाढ होणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून बुधवारी दुपारी ३ च्या दरम्यान १०८५ क्युसेस विसर्ग करण्यात आला असून हे पाणी जायकवाडी कडे झेपावले आहे. १५२२ फूट क्षमता असलेले जायकवाडी धरणाची पाणीपातळी बुधवारी १५१७ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा २३५७.४९४ दलघमी ( ८३ टिएमसी ) तर उपयुक्त जलसाठा १६१९.४९४ दलघमी  ( ५७ टीएमसी) एवढा झाला आहे. येणारी आवक लक्षात घेता धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण