लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सहा दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगार असलेल्या नाºयाला [नारायण भारत पवार] पकडले होते. त्याच्या साथीदारालाही शनिवारी रात्री गेवराई तालुक्यातील रेवकीदेवकी येथून स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.११ दिवसांपूर्वी गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली होती. ही सर्व पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवानाही केली होती.दरम्यान, स्वाती घाडगेने दिलेल्या वर्णनावरुन नाºयाचा साथीदार जावेद व अन्य एकावर संशय आला होता. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पप्या उर्फ जावेद विश्वास पवार [१९] रेवकीदेवकीत आल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचूना त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर चकलांबा व गेवराई पोलीस ठाण्यात दरोडा, लूटमार असे विविध गुन्हे दाखल आहेत. घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरणाशी त्याचा संबंध आहे की नाही याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
नाºयाचा साथीदार जावेदच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:30 IST