शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जालना पोलीसची कम्बाईन बँकर्सवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:53 IST

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरूअसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने चुरशीच्या लढतीत बलाढ्य कम्बाईन बँकर्स संघांवर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. अन्य लढतीत जिल्हा परिषदेने एलआयसी संघावर ८८ धावांनी दणदणीत मात केली. आज झालेल्या सामन्यात शेख अहमद आणि अब्दुल वहीद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरूअसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने चुरशीच्या लढतीत बलाढ्य कम्बाईन बँकर्स संघांवर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. अन्य लढतीत जिल्हा परिषदेने एलआयसी संघावर ८८ धावांनी दणदणीत मात केली. आज झालेल्या सामन्यात शेख अहमद आणि अब्दुल वहीद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.कम्बाईन बँकर्सने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ५ बाद १६५ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून शैलीदार फलंदाज मिलिंद पाटीलने ३७ चेंडूत ६ चौकारांसह ४८, राजेश कीर्तिकरने २१ चेंडूंत एक षटकार व ६ चौकारांसह ३९ धावा फटकावल्या. अमय उनकुलेने २७ व निखिल मुरुमकरने नाबाद १९ धावांचे योगदान दिले. जालना पोलीसकडून निरंजन चव्हाण व सतीश एस. यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जालना पोलीस संघाने विजयी लक्ष्य १८.४ षटकांत ८ गडी गमावून १६८ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून शेख अहमद याने २९ चेंडूंत २ षटकार व ४ चौकारांसह ४१, एम. राठोड याने १६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ निरंजन चव्हाणने १३ चेंडूंतच २ षटकार व एका चौकारासह २१, प्रल्हाद बकले याने १७ व बाळू बादुरे याने १२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १८ धावा केल्या. कम्बाईन बँकर्सकडून इनायत अलीने १६ धावांत ३, राजेश कीर्तीकरने २ व मिलिंद पाटील व महेंद्रसिंग कानसा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.तत्पूर्वी, सकाळच्या लढतीत जिल्हा परिषदने २0 षटकांत ५ बाद २0५ धावांचा डोंगर रचला. त्यांच्याकडून अब्दुल वहीदने ४३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह २७, अजय भंडारी याने २१ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह नाबाद ४१ व अरुण अल्हड याने २७ धावांचे योगदान दिले. आरीफ सय्यदने १६ धावा केल्या. प्रत्युत्तरात एलआयसी सं २0 षटकांत ७ बाद १२२ धावापर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून महेश रेड्डीने ३ चौकारांसह नाबाद ३0, विल्यम लालसरेने १४ धावा केल्या. जिल्हा परिषदकडून प्रदीप राठोडने २८ धावांत ३ गडी बाद केले.