शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.वर मात करीत जालना पोलीस चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:59 IST

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने जि.प. संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरी करणारा विजय जाधव सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने जि.प. संघावर मात करीत विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरी करणारा विजय जाधव सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.जिल्हा परिषद संघाने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकांत ८ बाद १८१ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून विजय सोनवणे याने २६ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह ३२ आणि संजय गिते याने २ चौकारांसह २९ व अमोल खरातने २२ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३१ धावांची खेळी केली. अरुण अल्हाडने २0 धावांचे योगदान दिले. जालना पोलीसकडून विजय जाधवने ३0 धावांत ३, बाळू बडुरेने २ व निरंजन चव्हाण व मनोज काळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जालना पोलीसने विजयी लक्ष्य २३ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून प्रल्हाद बकले याने ४४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३, ज्ञानेश्वर सानप याने ४ चौकार व एका षटकारासह ४४, मांगीलाल राठोडने २६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४१ व विजय जाधवने १३ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद १९ धावा केल्या. जि.प.कडून कर्णधा प्रदीप राठोड, आरेफ सय्यद यांनी प्रत्येकी २, तर विजय सोनवणे याने १ गडी बाद केला. बक्षीस वितरण जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम, महेंद्र गिरगे, पंकज जाधव, सीताराम पवार, महेंद्रसिंग कानसा, सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन पाटील, विवेक येवले, दीपक जावळे, संजीव बालय्या आदींनी परिश्रम घेतले.स्पर्धेचे मानकरीसामनावीर : विजय जाधवमालिकावीर : अब्दुल वहीदफलंदाज : मिलिंद पाटीलगोलंदाज : सतीश श्रीवासयष्टिरक्षक :सचिन पाटील