जालना : जालना नगर पालिकेत बुधवारी नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. नगरसेवकपदासाठी ८९५ तर नगराध्यक्षपदासाठी ३९ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र अर्ज संख्या मोठी असल्याने रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे नेमके किती अर्ज वैध व तर किती अवैध ठरले याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळू शकली नाही. भोकरदनभोकरदन नगरपरिषद निवडणुकीच्या छानणीमध्ये नगराध्यक्षपदासाठी १७ उमेदवाराचे तर नगरसेवक पदासाठी १०८ उमेदवाराचे ११५ उमेदवारी अर्ज वैध करण्यात आल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी एच़एग़वळी यांनी दिली आहे़ नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज अवैध तर नगरसेवकपदासाठी २३ जणांचे अर्ज अवैध ठरले. भोकरदन नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या उमेदवार मंजुषा राजेंद्र देशमुख, भाजपाच्या अर्चनाताई मुकेश चिने, राष्ट्रवादीच्या रिजवाना नईम कादरी, शिवसेनेच्या उज्वला भूषण शर्मा, यांच्यासह शबाना बेगम मदनी, लक्ष्मीबाई गणेशराव रोकडे, शहेनाजबेगम मोहम्मद कमर, रूकसाना बगेम शफीकखॉ पठाण, कल्पना पुरोहित, शेख वाहीदा परवीन, शमागेगम कादरी, शहनाज बेगम अब्दुल रहिम, नुरजहॉ सिद्दीकी, भाग्यश्री दांडगे, जमेलाबी शहा, शहेनाज बेग आय्युब बेग, सुरेखाबाई बाळु देशमुख या १७ उमेदवाराचे अर्ज वैध करण्यात आले. चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर नगरसेवकपदासाठी २३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. प्रभाग निहाय वैध ठरविण्यात आलेले अर्ज या प्रमाणे प्रभाग क्रंमाक एक (अ) मध्ये ६ उमेदवाराचे ७ अर्ज वैध करण्यात आले आहे प्रभाग क्रंमाक १ (ब) मध्ये ९ उमेदवाराचे १० अर्ज वैद्य करण्यात आले आहे प्रभाग क्रंमाक दोन (अ) मध्ये ६ उमेदवाराचे ६ अर्ज वैद्य करण्यात आले आहे तर प्रभाग क्रमांक दोन (ब) मध्ये ६ उमेदावारांचे ६ अर्ज वैध करण्यात आले आहे प्रभाग क्रमांक तीन (अ) मध्ये तीन उमेदवारांचे ३ अर्ज वैध करण्यात आले आहे प्रभाग कं्रमाक तीन (ब) मध्ये ६ उमेदवाराचे ७ अर्ज वैद्य करण्यात आले आहे प्रभाक क्रंमाक चार (अ) मध्ये ६ उमेदवाराचे ६ अर्ज वैध करण्यात आले आहे तर प्रभाग क्रंमाक चार (ब) मध्ये ८ उमेदवाराचे ९ अर्ज वैध करण्यात आले आहे प्रभाग कं्रमाक पाच (अ) मध्ये ८ उमेदवारांचे ८ अर्ज वैध करण्यात आले आहे तर प्रभाग क्रंमाक पाच (ब) मध्ये ६ उमेदवाराचे ६ अर्ज वैध करण्यात आले आहे प्रभाग क्रंमाक सहा (अ) मध्ये ६ उमेदवाराचे ६ अर्ज वैध करण्यात आले आहे तर प्रभाग क्रमांक सहा (ब) मध्ये ६ उमेदवारांचे ६ अर्ज वैध करण्यात आले आहे प्रभाग क्रंमाक सात (अ) मध्ये ८ उमेदवारांचे ९ अर्ज वैध करण्यात आले आहे तर प्रभाग क्रमांक सात (ब) मध्ये ८ उमेदवारांचे १० अर्ज वैध करण्यात आले आहे प्रभाग क्रंमाक आठ (अ) मध्ये ५ उमेदवारांचे ५ अर्ज वैध करण्यात आले आहे तर प्रभाग क्रंमाक आठ (ब) मध्ये ५ उमेदवारांचे ५ अर्ज वैध करण्यात आले आहे तर प्रभाग क्रमांक आठ (क) मध्ये ६ उमेदवारांचे ६ अर्ज वैध करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एच़ ए़ गवळी यांनी दिली. यावेळी तहसीलदार रूपा चित्रक, मुख्याधिकारी सचिन वाघमारे यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी या छानणी प्रक्रियेसाठी उपस्थितीत होते.
जालना पालिकेत वैध-अवैधचा घोळ कायम
By admin | Updated: November 3, 2016 01:46 IST