शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
3
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
4
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
5
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
6
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
7
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
8
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
9
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
10
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
11
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
12
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
13
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
14
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
15
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
16
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
17
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
18
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
19
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
20
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?

जायकवाडी @ ४१ टक्के

By admin | Updated: August 8, 2016 00:27 IST

पैठण : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावल्याने या जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग घटविण्यात आला.

पैठण : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावल्याने या जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग घटविण्यात आला. मात्र, शनिवारी या धरणांतून झालेल्या मोठ्या विसर्गामुळे गोदावरी भरभरून वाहत असून, रविवारी (दि.७) सायंकाळी जायकवाडी धरणात ७३,४९९ क्युसेक्सने आवक सुरू होती. वरील धरणांतून घटविलेला विसर्ग लक्षात घेता मध्यरात्रीनंतर धरणातील आवक घटण्याची शक्यता आहे. सध्या जायकवाडी धरणात ४१% जलसाठा झाला आहे. जायकवाडी धरणात रविवारी दुपारी १ वा. ४४,०९९ क्युसेक्स क्षमतेने होणारी आवक दुपारनंतर ७३,४९९ क्युसेक्सपर्यंत वाढली होती. वरून येणारे पाणी लक्षात घेता धरणात आवक होतच राहणार असून, जायकवाडीच्या जलसाठ्यात सोमवारी (दि.८) सायंकाळपर्यंत ४५% पर्यंत वाढ होण्याची अपेक्षा धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. जायकवाडी धरणाची पाणीपातळी १४ मार्च रोजी मृतसाठ्यात गेली होती. यादरम्यान धरणातून पिण्यासाठी २६७.०१२ दलघमी (९.४२ टीएमसी) पाणी उपसा करण्यात आला होता. हा मृतसाठा भरून उपयुक्त जलसाठा ४१% झाला आहे. रविवारी सायंकाळी ६ वा. धरणाची पाणीपातळी १,५०८.८१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १,६०४.४६५ दलघमी (५६.६५ टीएमसी) झाला असून, यापैकी उपयुक्त जलसाठा ८६६.३५९ दलघमी (३०.५९ टीएमसी) एवढा आहे.