शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जगदगुरूंची अड्ड पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:02 IST

श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व विरशैव समाज परळीच्या वतीने बुधवारी सायंकाळी केदारपीठाचे श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची परळी शहरातून अड्ड पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व विरशैव समाज परळीच्या वतीने बुधवारी सायंकाळी केदारपीठाचे श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची परळी शहरातून अड्ड पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. यामध्ये महिलांची लक्षणिय उपस्थिती होती. केदारपीठ जगदगुरूंचा विजय असो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, श्री संत मन्मथस्वामी महाराज की जय च्या जयघोषाने परळी दुमदुमली होती.हिमवत केदारपीठ उखीमठ, जि.रूद्रप्रयाग (उत्तराखंड) येथील श्री केदारनाथ रावल पदवी विभूषित वैराग्य सिंहासनाधिश्वर श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची संगीतमय इष्टलिंग महापूजा व धर्म जागृती, धर्मोपदेश येथील वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात बुधवारी आयोजित केली होती.विद्यानगर भागातील शंभू महादेव मंदिरापासून जगदगुरूंची अड्ड पालखी काढण्यात आली. शिवाजी चौक, बसस्टँड, रेल्वे स्टेशन रोड, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, गणेशपार रोड, नांदूरवेस, अंबेवेस मार्गे वैद्यनाथ मंदिरात पालखी आली. भक्तांनी रांगोळ्या काढून पालखीचे भक्तांनी स्वागत केले. यावेळी पुष्पवृष्टीही करण्यात आली.या सोहळ्यात सर्वश्री ष.ब्र.१०८ गुरवर्य तपोरत्न प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर, शंभुलिंग शिवाचार्य महाराज, अंबाजोगाई, श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, सिंगणापूर, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, चन्नबस्व शिवाचार्य महाराज बर्दापूर यांच्यासह इतर शिवाचार्य, राजेश देशमुख, दत्ताप्पा ईटके, नगराध्यक्षा सरोजनी सोमनाथअप्पा हालगे आदींची यावेळी उपस्थिती होती.