शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

जाफराबादचा पाणीप्रश्न पेटणार

By admin | Updated: December 23, 2016 00:19 IST

जाफराबाद : शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगर पंचायत जाफराबाद संघर्ष समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जाफराबाद : शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगर पंचायत जाफराबाद संघर्ष समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खडकपूर्णा प्रकल्पातून सिल्लोड, भोकरदन शहराकरिता सव्वाशे कोटींची पाणीपुरवठा योजना जाफराबादमधून जात असल्याने या योजनेचे पाणी आपल्या गावासाठी मिळावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी संघर्ष समिती स्थापन होत असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तू तू- मै मै सुरु झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा नसरीनबेगम शेख सऊद व प्रभारी नगराध्यक्ष दीपक पाटील वाकडे ,विषय समिती सभापती यांनी आपले हक्काचे पाणी आपल्याला मिळायलाच पाहिजे, असा सूर अळवायला सुरूवात केली आहे. तर याच दिवशी काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात जाफराबदला पाणी देण्यास आमचा विरोध नसल्याचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, कार्याध्यक्ष राजभाऊ देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. आता नगर पंचायतीच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.पाणी संघर्ष समिती स्थापन करून पाणी वाटपाबाबत काही ठोस निर्णय होत नाही. तो पर्यंत पाणी पुरवठा योजना हलू द्यायची नाही, अशी व्यूहरचना आखली जात आहे. या योजनमुळे नगर पंचायतच्या जुन्या पाणीपुरवठा योजना त्याच बरोबर अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचे मोठे नुकसान होणार आहे. खोदकामामुळे प्रमुख रस्त्यासह भारत संचार निगम, महावितरण कंपनी, व्यापारी यांचे देखील नुकसान करणार आहे.जाफराबाद शहराला बहु प्रतीक्षेनंतर मिळालेली साडेतीन कोटी रूपयांची महत्वकांक्षी पाणीपुरवठा योजना अखेर कुचकामी ठरली आहे. योजना शुभारंभ प्रसंगी ग्राम पंचायत, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागा, यांच्यापासून ते राज्यभर योजनेचा गाजावाजा झाला असला तरी ती स्पेशल अपयशी ठरला आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यापासून नगर पंचायतीची सर्व यंत्रणा देखभाल दुरूस्तीसाठी दिवस रात्र राबून देखील गावकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. यामुळे शहराची पाणी समस्या कायम आहे. (वार्ताहर)