जाफराबाद : विदर्भातील खडकपूर्णा प्रकल्पातून सिल्लोड- भोकरदनला पाणीपुरवठा योजना करण्यात येत असून, या योजनेतून जाफराबाद शहराला एक एमएलडी पिण्याचे पाणी देण्यात यावे, अशी मागणी जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जाफराबाद शहराची वाढती लोकसंख्या पाहता सध्या कार्यान्वित असलेली पाणीपुरवठा योजना कमी पडत आहे. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना ते देता येत नाही.
जाफराबादला हवे एक एमएलडी पाणी
By admin | Updated: January 8, 2017 23:53 IST