जाफराबाद : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना चलन पुरवठा होत नसल्याने ग्राहकांचा मुळावर येत आहे. चलनअभावी गेल्या काही महिन्यांपासून बोंबाबोंब सुरु आहे. ग्रामीण भागातील एखाद्या बँक शाखेत कॅश कमी मिळत नाही हे मान्य. परंतु जाफराबादसारख्या मोठ्या एकाच शाखेत वीस हजारपेक्षा अधिक खातेदारांची संख्या आहे. त्यातच तालुका शाखेला पाच ते दहा लाख रुपयांचे चलन देऊन बोळवण केली जात आहे.
जाफराबादेत चलन तुटवडा ग्राहकांच्या मुळावर...!
By admin | Updated: May 7, 2017 00:17 IST