शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जब्बारचा मारेकरी बबला अटकेत; बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून घेतले ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 11:22 IST

फरार झालेला कुख्यात शेख वाजेद शेख असद ऊर्फ बबला (२५, जहांगीर कॉलनी, जटवाडा रोड) याला अखेर बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून गुरुवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देजब्बारच्या खून प्रकरणात पोलिसांनी याआधी चौघांना अटक केली होती

औरंगाबाद : हिलाल कॉलनी येथील प्लंबर शेख जब्बार शेख गफ्फार याची अपहरणानंतर हत्या करून मृतदेह दौलताबाद येथील विहिरीत टाकून फरार झालेला कुख्यात शेख वाजेद शेख असद ऊर्फ बबला (२५, जहांगीर कॉलनी, जटवाडा रोड) याला अखेर बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून गुरुवारी रात्री अटक केली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी त्याला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

बेगमपुरा ठाण्याचे प्रभारी अधिकारी फौजदार राहुल रोडे यांनी सांगितले की, २० मे रोजी जब्बारचा मृतदेह विहिरीत सापडला. जब्बारच्या खून प्रकरणात पोलिसांनी याआधी चौघांना अटक केली होती आणि सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेल्यांमध्ये आरोपी मोहम्मद अलीमुद्दीन ऊर्फ अलीम अन्सारी मोहम्मद  मीनाजोद्दीन, शेख इम्रान ऊर्फ बाबा लोली शेख करीम, शेख कलीम ऊर्फ कल्लू शेख सलीम यांचा समावेश होता. शेख अमजद आणि त्याचा भाऊ बबला आणि मोहम्मद रिहान रिजवान, तसेच सिकंदर हे फरार होते. पूर्वी पकडलेल्या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीअंतर्गत  हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले आहे, तर कलीम पोलीस कोठडीत आहे. 

झोपेत असतानाच केली अटकगुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सिल्लोडच्या आंबेडकर चौकात एका दुकानासमोर बबला झोपल्याची माहिती फौजदार राहुल रोडे यांना कळली. शोध पथकातील अविनाश जाधव, श्रीकांत सपकाळ, नामदेव सानप, नागेश पांडे सिल्लोड येथे दाखल झाले. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बबला झोपलेला होता. त्याला कुठेही झोपण्याची सवय आहे. खातरजमा करून त्याला अटक केली. बबलाच्या विरोधात लुटमार, जखमी करणे, खून, असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाठीवर बॅग व त्यात कपडेपोलिसांनी बबलाला पकडले तेव्हा तो पोलिसांना झटका देऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. बेगमपुरा पोलिसांसाठी सतत आव्हान देत शहराबाहेर राहून पोलिसांना फोनवर संपर्क साधून स्वत:चा पत्ता १५ दिवस बदलत राहिला. त्याच्या सोबत एक पिशवी होती. त्यात कपडे आढळून आले. अमजद हा फरार असून, त्यालाही लवकरच पोलीस पकडतील, असे फौजदार रोडे यांनी सांगितले.