शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'..हा तर भारताचा खजिना'; ब्राझीलचा 'रॉकस्टार' गिलबर्टो गिलवर वेरूळ लेणीची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 16:10 IST

भारताची अतुलनीय संपत्ती असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देब्राझील- भारत ऐतिहासिक संबंधडेक्कन ओडिसी या शाही रेल्वेने झाले दाखल

औरंगाबाद :  ब्राझीलचे प्रख्यात संगीतकार, पॉपस्टार आणि राजकारणी गिलबर्टो गिल हे सध्या भारताच्या पर्यटनावर आले आहेत. सोमवारी त्यांनी जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला भेट दिली. भेटीनंतर त्यांनी, लेणीतील कलाकृती  अचंबित करणाऱ्या असून ही भारताची अतुलनीय संपत्ती असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या भेटीनंतर गिलबर्टो गिल यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. भारतीय संस्कृतीने भारावून गेलेल्या गिल यांनी वेरूळ लेणीतील कलाकृतीने आपण अत्यंत प्रभावित झालो असल्याचे सांगितले. या आधी लेणीबद्दल माहिती नसल्याची कबुली देत भारतीय पूर्वजांनी अत्यंत अद्वितीय अशी कलाकृती निर्माण केल्याचे म्हटले. भारतीय इतिहास आणि नागरीकरण हे खूप समृद्ध असल्याचे सांगत त्यांनी वेरूळ लेणीला प्रथमच भेट दिली असल्याचे सांगितले. या आधी त्यांनी भारतात केरळ येथे एका आश्रमाला भेट दिली असल्याचे सांगितले. 

ब्राझील- भारत ऐतिहासिक संबंधभारत आणि ब्राझील या दोन्ही देशात ऐतिहासिक संबंध आहेत. वसाहतवादाच्या काळात दोन्ही देशात पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. दोन्ही देशाची ऐतिहासिक नाळ जोडली गेली आहे. ब्राझिलियन नागरिकांना दिल्ली आणि राजस्थान संबंध अधिक माहिती आहे. यानंतर एकेकाळी पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या गोवा येथे भेट देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

पारंपारिक स्वागताने भारावून गेले 'किंग ऑफ पॉप' म्हणून जागतिक संगीत विश्वात प्रसिद्ध असलेले गिलबर्टो गिल हे सोमवारी सकाळी डेक्कन ओडिसी या आलिशान पर्यटन रेल्वेने शहरात दाखल झाले. यावेळी त्यांचे भारतीय परंपरेनुसार स्वागत करण्यात आले. यामुळे ते भारावून गेले होते. त्यांच्या सोबत इतर २२ पर्यटक होते. सर्व पर्यटक लागलीच वेरूळ लेणीच्या भेटीस रवाना झाले.

जागतिक संगीत,राजकारणावर प्रभाव गिलबर्टो गिल जगप्रसिद्ध गायक आहेत. जागतिक स्तरावर त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. त्यांनी ब्राझिलचे संस्कृतीमंत्री पदही भूषविले आहे. संगीतासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गिलबर्टो गिल हे ब्राझीलच्या संगीताची खरी ओळख आहे, असे म्हटले जाते.  रॉक, ब्राझिलियन लोकसंगीत, सांबा , आफ्रिकन संगीत आणि अनेक वाद्य वाजविण्यात त्यांचा हातखंडा आहे. यासोबतच ब्राझील आणि जागतिक राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते. ते पर्यावरण चळवळीत सुद्धा सक्रीय आहेत.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबादBrazilब्राझील