शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्टेशनवर चहा पिण्यासाठी दररोज लागणार ५ हजार कुल्हड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 20:05 IST

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वेस्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी  ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देप्रत्येक रेल्वेस्टेशनवर मिळणार ‘’कुल्हड’मधून चहा. कुल्हड म्हणजे मातीचे बोळके (कप) होय.

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावर यापुढे प्लास्टिक कपाऐवजी ‘कुल्हड’मधून चहा मिळणार आहे. दररोज ५ हजारांच्या जवळपास कुल्हड लागतील. यामुळे पुन्हा रोजगार मिळण्याच्या स्थानिक कुंभार कारागिरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वेस्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी  ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. कुल्हड म्हणजे मातीचे बोळके (कप) होय.  २००४ ते २००९ दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव  यांनी पहिल्यांदा कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती.  जिल्ह्यातील एकूण १० रेल्वे स्थानके आहेत. लॉकडाऊन आधी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर दररोज  अडीच ते तीन हजार कप चहा विकला जात होता. अन्य स्थानकातील ८०० ते १००० कप म्हणजे दररोज ५ हजार कप चहा विकत असे. आता कुल्हडमधून चहा देण्यात येणार असल्याने  कंत्राटदाराला शहरातून  कुल्हड खरेदी करावे लागेल.

स्थानिक कुंभारांना मिळेल रोजगारलालूप्रसाद यादवांच्या काळात स्थानिक व्यावसायिक दररोज अडीच ते तीन हजार कुल्हड रेल्वे स्टेशनवरील हॉटेलला पुरवत होते. कुल्हड वापरून फेकून दिले जातात. सध्या एक कुल्हड दीड ते अडीच रुपयांदरम्यान मिळतो. यामुळे चहाचे दर वाढविण्याची शक्यता आहे. 

अद्याप आदेश अप्राप्त जालना ते वैजापुरात नोकरी करणारा नोकरदारवर्ग रेल्वेप्रवासात चहा जास्त पितो. रेल्वे प्रवासी कमी चहा पितात.  प्रवासी संख्या कमी असल्याने सध्या चहा बंद आहे. अजून कुल्हडमधून चहा देण्याचे आदेश आम्हाला मिळाले नाही. मजहर खान, हॉटेल व्यावसायिक.

कुल्हड नाही परवडतएक कुल्हड दीड ते अडीच रुपयांत मिळते. करारानुसार कंत्राटदारला कुल्हडमधून चहा देणे परवडत नाही. चहाचे दर वाढले तर कुल्हडमधून चहा देणे परवडेल. - अतीश विधाते, चहा विक्रेता  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासी