शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांचा प्रश्न शहरासाठी बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:46 IST

औरंगाबाद शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नात केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी लक्ष घातले असून, त्यांच्या सूचनेनुसार पुणे येथील काही तज्ज्ञ सोमवारी औरंगाबादेत दाखल झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नात केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी लक्ष घातले असून, त्यांच्या सूचनेनुसार पुणे येथील काही तज्ज्ञ सोमवारी औरंगाबादेत दाखल झाले. त्यांनी शहराच्या काही भागात जाऊन पाहणी केली असता जिकडे तिकडे विदारक असे चित्र पाहायला मिळाले. मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेने कुत्र्यांची अजिबात नसबंदी केलेली नाही. त्यामुळे कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात हा प्रश्न गंभीर बनू नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डावर अनेक वर्षांपासून काम करणा-या ....आणि पुण्यात एनजीओ चालविणा-या मंजिरी राजगोपाल सोमवारी औरंगाबादेत दाखल झाल्या. त्यांनी नारेगावसह शहरातील विविध वसाहतींना भेट दिली. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, सभापती गजानन बारवाल यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना दोघीही म्हणाल्या की, कुत्र्यांची नसबंदी न होणे हा गंभीर मुद्या आहे. कुत्रे आणि मानवासाठी हे हितावह नाही. शहरात ४० हजारांहून अधिक कुत्रे झाले आहेत. शहरातील कुत्रे नारेगावला नेऊन सोडण्यात येतात. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कुत्रे माणसांचे मित्र आहेत. ते आपला, परका कोण हे ओळखतात. त्यांना माणसांचा वास येतो. जंगलात हे कुत्रे वाढले तर अधिक धोका असतो. त्यांची पिल्लेही मानवाच्या सान्निध्यात वाढणार नाहीत. कुत्रा जिथे पकडला त्याला तिथेच नेऊन सोडावे हा नियम आहे. कुत्रे कसे पकडावेत, त्यांच्यावर नसबंदी कशी करावी याचे प्रशिक्षण मनपाचे डॉक्टर आणि कर्मचाºयांना पुण्यात देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मनपा आणि खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने भविष्यात नसबंदीची मोहीम राबविण्यात येईल, असेही राजगोपाल यांनी नमूद केले.शहरात उघड्यावर होणा-या मांस विक्रीच्या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शविला. आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. कोणत्याच उपाययोजना या दुकानांमध्ये नाहीत. अनेक दुकाने अनधिकृतपणे सुरू आहेत. शहराचे चित्र पाहून कायदा आहे किंवा नाही, असे वाटायला लागते. मटनाच्या दुकानात एकही माशी दिल्यास १ लाख रुपये दंड आहे. गायीचे मांस मटन म्हणून दिल्यास ३ लाख रुपये दंड आहे. फूड सेफ्टी स्टँडर्ड अ‍ॅक्ट २०११ मध्ये हे सर्व नमूद आहे.