शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेरखान खून प्रकरणातील फरार आरोपी इस्माईल नाना अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 18:45 IST

शेरखान यांच्या खून प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ११ झाली.

ठळक मुद्देगुजरात, राजस्थानमध्ये गेला होता पळून

औरंगाबाद : हॉटेल व्यावसायिक शेरखान यांचा खून केल्यापासून पसार झालेला संशयित आरोपी इस्माईल नाना ऊर्फ सय्यद इस्माईल सय्यद हुसेन (५२, रा.  रशीदपुरा) याला गुन्हे शाखेने सोमवारी सापळा रचून पकडले. इस्माईल नाना हा सतत पोलिसांना चकमा देत होता. पळून गेल्यानंतर त्याच्या पायाला फ्रॅ क्चरही झाले होते. शेरखान यांच्या खून प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ११ झाली.

२८ डिसेंबर २०१७ रोजी रात्री छावणी परिसरात हुसेन खान ऊर्फ शेरखान अलियार खान (५१, रा. छावणी) यांचा लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून कट रचून आणि मुन्ना बोचरा याला सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. शेरखान यांच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून ८ आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या गुन्ह्यातील संशयित इस्माईल नाना हा घटनेपासून पसार झाला होता. 

दरम्यान, इस्माईल नाना हा दिल्ली आणि परभणी येथील जमात सोबत गेला होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, याकरिता  सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता. दरम्यान, तो दोन दिवसांपूर्वी शहरात आला असून, तो सोमवारी दुपारी महापालिका कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना दिली. त्यानंतर सहायक निरीक्षक जारवाल आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून इस्माईल नानाला पकडले. आरोपी हा जमातला असताना त्याचा अपघात झाल्याने जखमी झाला होता. तेव्हाही त्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती समोर आली.