शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा आहे की उन्हाळा? एसीमुळे वीजबिलही वाढले !

By साहेबराव हिवराळे | Updated: August 25, 2023 19:23 IST

वीज वापराचा खर्च वाढलेला आहे. मीटर जोरात फिरू लागले आहे. त्याचा परिणाम मासिक बिलातून दिसणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात ज्याप्रमाणे सर्रास एसीचा वापर होतो तसाच वापर सुरू असल्याने विजेच्या मागणीत गत एका महिन्यापासून वाढ झाल्याची माहिती आहे. या दिवसांमध्ये दिवसाला विजेचा वापर कमी जास्त होण्याचे प्रमाण असते; मात्र सरासरी काढल्यास विजेचा वापर हा उन्हाळ्याप्रमाणेच सुरू असल्याची माहिती आहे. विजेचा वापर वाढला असला तरी बहुतांश परिसरात आता सोलर पॅनलही लागल्याने विजेची निर्मितीही बरीच होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विजेची मागणी कमी जास्त राहते; मात्र बऱ्याच वर्षांनंतर यावर्षी उन्हाळ्याप्रमाणेच विजेची मागणी असून, वापर वाढला आहे.

तापमानाचा पारा ३२ अंशांवरउन्हाळ्यातील तापमान ४६ डिग्रीपर्यंत गेलेले असतानाही विजेचा वापर वाढलेला होता. तेवढाच वापर आता तापमान २७.९ ते ३० वर असतानाही सुरू असून, उकाड्याच्या वातावरणामुळे एसी सतत सुरू असल्याचेही दिसून येत आहे. वीज वापराचा खर्च वाढलेला आहे. मीटर जोरात फिरू लागले आहे. त्याचा परिणाम मासिक बिलातून दिसणार आहे.

आतापर्यंत केवळ ४२ टक्के पाऊससरासरीच्या ४२-४४ टक्के पाऊस झाला आहे. जुलैत पाऊस आल्यानंतर पावसाने मोठी दांडी मारली. अशातच कडाक्याचे ऊन असल्याने एसीचा वापर वाढला, मात्र शनिवारी पाऊस बरसल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. त्याची ही नोंद केवळ १० मि.मि. नोंदण्यात आली.

तलावांतील साठाही तळाला जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने तलावांमध्ये, तसेच जलसाठ्यांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा आहे. ३४ पाण्याची उपलब्धता आहे. पिकांचा प्रश्न वाईट असून, तलावात पिण्यासह, वापरण्याच्या पाण्याचा साठा आहे. वाढत्या तापमानामुळे काय अवस्था उद्भवेल हे सांगता येत नाही.

सध्या वीज वापर वाढलेलाच...सद्या वीज वापर वाढल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरासह जिल्ह्यात उकाडा असल्याने नागरिक घरात एसीचा जास्त वापर करतात. यामुळे पावसाळ्याचे दिवस असतानाही विजेचा वापर वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गतमहिन्यापेक्षा वीज आकार मासिक बिलात दिसून येणार आहे.- प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता विभाग-१

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद