शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

पर्यटनाचा की पर्यटकांना लुटण्याचा हंगाम? बीबी का मकबऱ्यात पार्किंग शुल्काची मनमानी वसुली

By संतोष हिरेमठ | Updated: October 20, 2025 17:50 IST

रिॲलिटी चेक: 'मकबरा' पाहणार की लूट सहन करणार? शुल्काचा फलक गायब करून पार्किंग चालकांकडून पर्यटकांची दिशाभूल

छत्रपती संभाजीनगर : ‘दख्खनचा ताज’ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सध्या पार्किंग चालकाकडून सर्रास लूट सुरु आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या म्हणण्यानुसार, दुचाकीच्या पार्किंगसाठी ४ तासांसाठी १० रुपये शुल्क आहे; परंतु पार्किंग चालकाकडून मनमानी पद्धतीने दुप्पट वसुली केली जात आहे. चारचाकीसाठीही अशीच मनमानी ‘वसुली’ केली जात आहे. याकडे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचा मात्र कानाडोळा होत आहे.

पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळेही बीबी का मकबऱ्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहे. या सगळ्यात पार्किंगमधील मनमानी वसुलीविषयी पर्यटकांमधून संताप व्यक्त होत आहे. परिसरातील पार्किंगमध्ये शुल्काचा फलकच नसल्याने पर्यटक गोंधळात पडतात आणि पार्किंगचालक त्याचा गैरफायदा घेतात.

शुल्काचा फलक गायबबीबी का मकबरा परिसरातील पार्किंगमध्ये शुल्काचा फलकच नाही. त्यामुळे पार्किंगचे शुल्क किती आहे, हे पर्यटकांना कळू शकत नाही.

रस्त्यावरही पार्किंगबीबी का मकबऱ्यासमोर थेट रस्त्यावरही पार्किंगची सोय करण्यात आली आहे. याठिकाणीही दुचाकी, चारचाकीधारकांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसुली केली जात आहे.

मकबरा परिसरातील पार्किंग शुल्कवाहन प्रकार- ४ तासांसाठी- ४ तासांपेक्षा अधिक वेळबस, मिनी बस - ६० रु. -८० रु.कार, तीन चाकी- ३० रु.- ५० रु.दुचाकी - १० रु.- २० रु.सायकल - ५ रु. - १० रु.

चौकशी केलीयाविषयी मी चौकशी केली. पार्किंगमधील बोर्ड खराब झाला आहे. आता त्याची दुरुस्ती केली जात आहे. लवकरच तो बसवला जाईल.- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण.

English
हिंदी सारांश
Web Title : BB ka Maqbara: Tourist season or a season to loot tourists?

Web Summary : Tourists visiting BB ka Maqbara are being overcharged for parking. Despite fixed rates by the Archaeological Survey of India, parking operators are charging double. A rate display board is also missing, exacerbating the issue. Authorities are investigating and promise a new board soon.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBibi-ka-Maqbaraबीबी का मकबराArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण