शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन कंत्राटदारांचे की शेतकऱ्यांचे! तलावांच्या दुरुस्तीवर ३ वर्षांत ३ कोटींचा चुराडा

By विजय सरवदे | Updated: July 11, 2023 20:12 IST

पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला सिंचनाचा फायदा झाला पाहिजे, या हेतूने जिल्हा परिषदेने तलाव, बंधारे उभारले.

छत्रपती संभाजीनगर : पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. मात्र, त्या प्रमाणात सिंचन क्षेत्र वाढलेले दिसत नाही. जिल्हा परिषदेने मागील तीन वर्षांत ५७ तलावांच्या दुरुस्तीवर ३ कोटी १८ हजार रुपये खर्च केले. त्यानंतरही तलाव व बंधाऱ्यांत सुमारे ४ ते ५ कोटी लिटरच्या पुढे पाणीसाठा गेलेला नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या माध्यमातून ‘सिंचन’ कंत्राटदारांचे झाले की शेतकऱ्यांचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.

पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतीला सिंचनाचा फायदा झाला पाहिजे, या हेतूने जिल्हा परिषदेने तलाव, बंधारे उभारले. यातून जिल्ह्यातील १०-१५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणे अपेक्षित आहे. मात्र, आजपर्यंत ५-६ हजार हेक्टरच्यापुढे हा आकडा गेलेला नाही. उलट दरवर्षी दुरुस्ती व नवीन सिमेंट बंधारे उभारण्याच्या माध्यमातून कंत्राटदारच गब्बर होत आले आहेत. मागील तीन वर्षांचा आढावा घेतला तर सन २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या काळात सर्व मिळून ५७ दुरुस्तीच्या कामांवर जिल्हा परिषदेच्या उपकरातून २ कोटी ९ लाख ११ हजार रुपये, तर ‘डीपीसी’च्या निधीतून एक कोटी नऊ लाख आठ हजार रुपये असे एकूण तीन कोटी १८ लाख १९ हजार रुपये खर्च केले आहेत. यातून २१ तलाव आणि ३६ कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली आहे.

कोल्हापुरी बंधाऱ्यांची सिंचन क्षमताजिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे असून, यातील संकल्पित पाणीसाठा सहा कोटी ७१ लाख ४५ हजार लिटर एवढा आहे. गेल्यावर्षी या बंधाऱ्यांमध्ये दोन कोटी ७७ लाख ११ हजार लिटर पाणी साठल्याची नोंद असून, याचा पाच हजार ५४३ हेक्टर शेतीला लाभ झाला. वास्तवात यातून १३ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले पाहिजे, ही अपेक्षा आहे. मात्र, काही बंधाऱ्यांंतून गेटअभावी पाणी वाहून गेल्याचे सांगितले जाते.

गेटसाठी यंदा पावणेचार कोटींची तरतूदजिल्ह्यातील १२० कोल्हापुरी बंधाऱ्यांना दोन हजार ७३० गेटची गरज आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) यंदा तीन कोटी ७४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी ई-निविदा काढण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसांत निविदा अंतिम करून कार्यारंभ आदेश निघतील. गेट बसविल्यानंतर सिंचन क्षेत्र वाढेल, असे प्रभारी कार्यकारी अभियंता आशिष चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार