शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! पूर्णा नदीपात्रातील ७ बॅरेजेसमुळे सिंचन क्षेत्र वाढणार; सत्तारांनी चालत जात केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 19:29 IST

बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास ३३ किलोमीटरपर्यंत पाणी अडवून यातून ५४ टक्के सिंचन क्षेत्रात वाढ

सिल्लोड : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात ७ नवीन बॅरेजेस बांधण्याच्या कामाचे आज अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत भवन ते केऱ्हाळा  खोडकाईवाडी असे जवळपास ६ किलोमीटर नदीपात्रात पायी चालत बॅरेजेसच्या नियोजीत जागेची पाहणी केली.

सिल्लोड ते कन्नड हद्दीपर्यंत पूर्णा नदीच्या पात्रात एकूण ७ बॅरेजेस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च अखेर बॅरेजेस उभारण्यासाठीचे सर्व प्रशासकीय कारवाई पूर्ण होवून येत्या एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सदरील बॅरेजेसचे काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास ३३ किलोमीटर पर्यंत पाणी अडवून यातून ५४ टक्के सिंचन क्षेत्रात वाढ होईल. यामुळे निश्चितपणे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदत होईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

अजिंठा खोऱ्यात पाणी अडविण्यासाठी जमीन संपादित करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अजिंठा खोऱ्यात तातडीने सर्वेक्षण करणे, अजिंठा येथील निजाम कालीन बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करणे तसेच अजिंठ्याच्या खोऱ्यात अधिक सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण कामाला सुरुवात करने ,सिद्धेश्वर खोऱ्यात पाणी साठवण व नियोजन करणे, शिवना ते अजिंठा गावाच्या रस्त्याने नवीन पाझर तलावासाठी सर्वेक्षण करणे, जुई नदीचे पाणी वाहून जाते सदरील पाणी अजिंठा - अंधारी प्रकल्पात वळविण्यासाठी उपाययोजना करणे,खेळणा मध्यम प्रकल्पाची जल साठवण क्षमता वाढीसाठी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात सर्व निकष व नियमांच्या अधिनराहून उपायोजना करन्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तहसीलदार विक्रम राजपूत,प.स. सभापती डॉ. संजय जामकर, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, नरेंद्र पाटील, संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे,राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे,माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन  हजर होते.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबाद