शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे ट्रक, कार विक्री प्रकरणात चेसिस नंबर बदलण्यासाठी वापरले लोखंडी ठसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:11 IST

गुन्हे शाखेने नगरसेवकाच्या भावासह चार जणांकडून वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर बदलण्यासाठी वापरलेले एबीसीडीचे २६ आणि ० ते ९ चे आकडे असलेले लोखंडी ठसे जप्त केले आहेत. 

ठळक मुद्दे भिवंडी पोलिसांनी औरंगाबादेतील एमआयएमचा नगरसेवक शेख जफर यास अटक केली आहे, फसवणुकीच्या गुन्ह्यात नगरसेवक जफरचा भाऊ शेख बाबर पोलीस कोठडीत आहे.

औरंगाबाद : भाड्याने घेतलेल्या हायवा ट्रकचे रंग आणि चेसिस नंबर बदलून परस्पर विक्री करणाऱ्या राज्यव्यापी रॅकेटचा मुख्य सूत्रधार धुळे येथील जावेद मणियार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, गुन्हे शाखेने नगरसेवकाच्या भावासह चार जणांकडून वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर बदलण्यासाठी वापरलेले एबीसीडीचे २६ आणि ० ते ९ चे आकडे असलेले लोखंडी ठसे जप्त केले आहेत. 

गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील विविध ठिकाणांहून चोरलेल्या हायवा आणि अन्य वाहनांचे रंग, चेसिस आणि इंजिन नंबर बदलून त्या वाहनाची बनावट कागदपत्रे तयार करून वाहने विक्री करणाऱ्या राज्यव्यापी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी औरंगाबादेतील एमआयएमचा नगरसेवक शेख जफर यास अटक केली आहे, तर जफरचा भाऊ शेख बाबरसह चार जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यात नगरसेवक जफरचा भाऊ शेख बाबर पोलीस कोठडीत आहे. चौकशीदरम्यान बाबरने गुन्ह्याची कबुली देत सुमारे दीड वर्षापासून त्यांनी हा गोरखधंदा सुरू केल्याचे सांगितले.

बाबरचे चिकलठाणा येथे टाटा मोटार गॅरेज आहे. या गॅरेजवर आरोपी जावेद मणियार हा चोरीची वाहने आणून देत असे. त्यानंतर बाबरचे लोक वाहनांचा रंग बदलत. शिवाय वाहनांवरील मूळ चेसिस आणि इंजिन नंबर कटरने खोडून टाकत आणि नवीन नंबर टाकले जात असत. नवे इंजिन आणि चेसिस नंबर जुन्या क्रमांकासारखेच हुबेहूब दिसावेत, यासाठी त्यांनी क्रमांक टाकण्यासाठी विशिष्ट असे लोखंडी ठसे (क्रमांक आणि एबीसीडी) तयार करून आणले होते. हे ठसे, कटर आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. 

जावेद मणियार मुख्य सूत्रधारपोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार धुळे येथील जावेद मणियार आहे. शिवाय गुरुप्रीतसिंग हा देखील पोलिसांना वाँटेड आहे. जावेद मणियार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यास जळगाव, धुळे आणि गुजरात पोेलिसांनीही अटक केली होती.