शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
3
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
4
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
5
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
6
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
7
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
8
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
9
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
10
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
11
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
12
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
13
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
14
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
15
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
16
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
17
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
18
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
19
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
20
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!

गुंतवणूकदारांचा दबाव अन् एजंटांची घुसमट

By admin | Updated: May 8, 2015 00:27 IST

श्रीपाद सिमंतकर , उदगीर एचबीएन कंपनीकडून थकलेल्या रकमा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार एजंटांवर दबाव वाढवित आहेत़ पोटापाण्यासाठी कमाईचे साधन आणि नातेवाईक

श्रीपाद सिमंतकर , उदगीरएचबीएन कंपनीकडून थकलेल्या रकमा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार एजंटांवर दबाव वाढवित आहेत़ पोटापाण्यासाठी कमाईचे साधन आणि नातेवाईक व मित्रमंडळींना बचत करायला लावणे या चांगल्या उद्देशासाठी एचबीएन कंपनीच्या योजनेत एजंटांनी मेहनतीने पैसे जमा करीत नवीन खातेदार जोडले़ सुरुवातीची काही वर्ष या एजंटांच्या अंतर्गत गुंतवणूकदारांना परतावे देखील प्राप्त झाले़ मात्र गेले जवळपास वर्षभर परतावे रखडल्यामूळे गुंतवणूकदार हातघाईशी आले असून परताव्यासाठी एजंटांकडे जावून दबाव वाढवित आहेत़ अनेक एजंट कार्यालयात ठाण मांडून बसले असून यावर उपाय काय याची चर्चा करीत आहेत़पोटासाठी केले आणि गळ्याशी आले़़़एस़ टी़ खात्यातून सेवानिवृत्तीनंतर चरितार्थ चालविण्यासाठी उदगीर येथील जी़ बी़ गरड यांनी एजंट म्हणून उदगीर शाखेत काम सुरु केले़ मोलमजुरी करणाऱ्या लोकांनी ८० रु़ पासून गुंतवणूक सुरु केली़ त्यांचे आज जवळपास ४० ग्राहक आहेत़ परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या ग्राहकांचा परतावा परत न मिळाल्यामूळे पदरमोड करुन गरीबांच्या गरजा भागविता भागविता त्यांचा खिसा पुरता रिकामा झाला असून ग्राहक अंगावर येण्याचे प्रकार घडत असल्याचे गरड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़ आम्ही तुमच्याकडे पैसे जमा केले तुम्हीच आमचा परतावा द्या या ग्राहकांच्या प्रश्नापूढे एजंट निरुत्तर होत आहेत़ अनेक एजंटांचे नातेवाईक गुंतवणूकदार आहेत तर अनेक महिला एजंट असून रोज गुंतवणूकदार घरी चकरा मारीत असल्यामूळे संसारातही त्रास होत आहे़ सिमाभागातील मोठी गुंतवणूक या शाखेत आहे़ चांदोरी येथील रामराव नरसप्पा मेहत्रे यांनी आपल्या भावना लोकमतकडे मांडत असताना ग्राहकांचे पैसे मिळालेच पाहिजे यासाठी दिवसरात्र तळमळत असल्याचे सांगितले़ त्यांच्या अंतर्गत १० गुंंतवणूकदारांची खाती चालू आहेत़ बोटावर मोजण्या इतक्या कमिशनसाठी ढिगभर ताण घ्यावा लागत आहे़ ४संगारेड्डी शाखेतही अशीच परिस्थिती आहे़ बिदर शाखेतील मात्र परतावे दिल्यामूळे शाखा एचबीएन को आॅपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीत दाखल झाली अशीही चर्चा कार्यालयात ऐकण्यात आली़