शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांनी लावली चिरीमिरीची सवय; त्रास भोगताहेत शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:00 IST

फेरफारीचे ३९९५ प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत : मंडळ अधिकारी स्तरावर तीन-तीन महिने प्रस्ताव प्रलंबित

श्रीकांत पोफळेशेंद्रा : महसूल विभागाच्या आॅनलाईन संकेत स्थळावरील माहितीनुसार औरंगाबाद तालुक्यात मंडळ अधिकारी स्तरावर फेरफारीचे तब्बल ३९९५ प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्व भागात एमआयडीसीभोवती गुंतवणूकदारांनी फेरफारसाठी पैशांची सवय लावली. त्याचा त्रास होत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.आॅनलाईन ही प्रणाली शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली आहे. परंतु आजघडीला महसूलच्या अधिकृत आॅनलाईन संकेत स्थळावरील ताज्या माहितीनुसार मंडळ अधिकारी स्तरावर तब्बल ३९९५ प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहते. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार अर्ज दाखल झाला की तीन दिवसांत तो निकाली निघणे अपेक्षित आहे. परंतु तीन तीन महिने फेरीफरीचे प्रस्ताव मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात नेहमी वाद उपस्थित होत असतात. कृष्णापूरवाडी येथील एका शेतकºयाने अशाच प्रकरणामुळे आत्महत्या केली असूनसुद्धा परिस्थिती सुधारत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागात एमआयडीसी आल्यानंतर या परिसरात मोठमोठ्या गुंतवणूकदारांनी शेतजमिनी खरेदी केल्या. कोटी कोटी रुपयांचे व्यवहार या परिसरात झाले. अशा गुंतवणूकदारांची मालमत्ता त्यांच्या नावावर होण्यासाठी म्हणजे सातबारा उताºयावर त्यांचे नाव येण्यासाठी फेरफार नोंदी घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी संबंधित तलाठ्यामार्फत फेरीफारीचा प्रस्ताव मंडळ अधिकाºयांकडे पाठवला जातो. हा प्रस्ताव मंजूर झाला की सातबाºयावर खातेदाराच्या नावात बदल केल्या जातो. खरेदी खताच्या आधारे मालमत्ता खरेदी केलेल्या खातेदाराचे नाव सातबाºयावर घेतल्या जाते. त्यासाठी मोठमोठे गुंतवणूकदार पैसे देऊन तात्काळ प्रकरणे मंजूर करून घेतात. त्यामुळे चिरीमिरी झाल्याशिवाय फेरीफरीची प्रकरणे मंजूर होत नसल्याची तक्रार अनेक शेतकरी करत आहेत. फेरफर मंजुरीची अनेक प्रकरणे काही लालसेपोटी प्रलंबित आहे की, त्यामागे दुसरे कारण आहे, हा विषय बाजूला ठेवला तरी, प्रलंबित असलेल्या आकड्यांची संख्या पुष्कळ बोलकी आहे. रक्तातील नात्यात खातेफोड करायची असली तरी फेरफारची मंजुरी आवश्यक असते. नोकरदार नागरिकांनी सुद्धा एमआयडीसीच्या भोवती प्लॉट खरेदी केलेले आहेत. आपल्या पगारातून काटकसर करून त्यांनी जमा पैशात त्यांनी ही गुंतवणूक केलेली असते. अशा अनेक प्रलंबित प्रकरणामुळे शेतकºयांची व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते, हे नक्की. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून तात्काळ ही प्रकरणे निकाली काढावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असतील, असे वाटत नाही. संकेतस्थळावर उपलब्ध माहिती चुकीची असू शकते. तरी सुद्धा मी या प्रकरणाची तात्काळ माहिती घेतो.-सतीश सोनी, तहसीलदार, औरंगाबाद

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी