शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहाराचा उलटा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:45 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठा गाजावाजा करुन कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यात आली़ सुरुवातीचे तीन महिने नोटा टंचाईमुळे नाईलाजाने का होईना कॅशलेसच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती़ आता नोटाबंदीची वर्षपूर्ती होत असताना चलनात पुरेशा प्रमाणात असलेल्या नोटांमुळे नांदेडकर पुन्हा रोकडरहित व्यवहारांकडे वळले आहेत़ त्यामुळे कॅशलेसचा उलटा प्रवास सुरु झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठा गाजावाजा करुन कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यात आली़ सुरुवातीचे तीन महिने नोटा टंचाईमुळे नाईलाजाने का होईना कॅशलेसच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती़ आता नोटाबंदीची वर्षपूर्ती होत असताना चलनात पुरेशा प्रमाणात असलेल्या नोटांमुळे नांदेडकर पुन्हा रोकडरहित व्यवहारांकडे वळले आहेत़ त्यामुळे कॅशलेसचा उलटा प्रवास सुरु झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला रात्री नोटाबंदीची घोषणा केली़ त्यानंतर दुसºया दिवसापासून बँक, पोस्ट कार्यालयात जुन्या नोटा जमा करण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकांमध्ये भरल्या. शंभर आणि पन्नासच्या नोटा त्यावेळी मोठ्या प्रमाणात चलनात होत्या़ जवळपास दीड ते दोन महिने नागरिकांना आपल्याकडील जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठीच धडपडावे लागले़ त्यानंतर भरलेले पैसे काढण्यावरही अनेक निर्बंध टाकण्यात आले़ त्यामुळे चार ते पाच महिने नोटाबंदीचा हा घोळ सुरुच होता़ चलनटंचाईमुळे सरकारने कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले़ त्यासाठी तयारीही केली होती़नांदेडकरांनीही चलनटंचाईवर पर्याय म्हणून सुरुवातीचे दोन ते तीन महिने कॅशलेस व्यवहारावर भर दिला़ त्यावेळी नांदेडातील बाजारपेठेत जवळपास ४० ते ५० टक्के व्यवहार हे कॅशलेसद्वारे होत होते़ विशेष म्हणजे, त्यावेळी कॅशलेस व्यवहारावर सवलतही देण्यात येत होती़ तीन महिन्यानंतर या व्यवहारावरील सवलती बंद झाल्या़ बँकांही कॅशलेस व्यवहारावर अतिरिक्त शुल्क आकारु लागल्या़ त्यात आता चलनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले़ त्यामुळे नांदेडकर पुन्हा रोकडरहित व्यवहाराकडे वळले़ आजघडीला बाजारपेठेत जेमतेम १० ते १५ टक्के कॅशलेस व्यवहार होत आहेत़ त्यामुळे कॅशलेस व्यवहाराचा नांदेडमध्ये उलटा प्रवास सुरु असल्याचे दिसत आहे़