औरंगाबाद : लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फक्त कॅम्पस क्लबचे सदस्यच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.ही समूहगीत गायन स्पर्धा आहे. यामुळे एका शाळेचा एक समूह याप्रमाणे आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवू शकता. एका समूहात जास्तीत जास्त २० आणि कमीत कमी १० स्पर्धक सहभागी होऊ शकतात. पाच विद्यार्थी संगीतवाद्ये वाजवू शकतात. स्पर्धकांनी फक्त हिंदी भाषेतच गीत सादर करावयाचे आहे. प्रत्येक समूहासाठी सात मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. सादरीकरणाच्या अगोदर समूहातील एका विद्यार्थ्याने जे गाणे गावयाचे आहे, त्याचे संगीतकार आणि गीतकार याबद्दल माहिती द्यावी. शाळेच्या गणवेशातच गाण्याचे सादरीकरण करणे अनिवार्य आहे. या स्पर्धेसाठी जे गीत आपण गाणार आहात, त्या गीताची नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे दि. ८ आॅगस्ट. ही स्पर्धा पॉवर्ड बाय अभिनव इंटरनॅशनल स्कूल (चिकलठाणा) आहे. १२ आॅगस्ट रोजी स. १० वा. संत एकनाथ रंगमंदिर येथे ही स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या माध्यमातून नावनोंदणी करावी. संगीत शिक्षकांनी गाण्याच्या नोंदणीसाठी ९९२१०३०७०० या क्रमांकावर स. ११ ते सायं. ५ या वेळेत संपर्क करावा. मित्रांनो, सदस्यता नोंदणीचे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. ही स्पर्धा केवळ कॅम्पस क्लब सदस्यांसाठीच असल्यामुळे तुम्ही लवकर कॅम्पस क्लबचे सदस्य व्हा आणि या स्पर्धेत सहभाग नोंदवा. रीगल लॉन, लोकमत भवन येथे स. ११ ते सायं. ५ या वेळेत नावनोंदणी सुरू आहे. कॅम्पस क्लब सदस्यांसाठी लवकरच भव्य चित्रकला स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. रविवारीसुद्धा नावनोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी स. ११ ते सायं. ५ या वेळेत ७०३८०३६७७८ या क्रमांकावर संपर्क करावा.
आंतरशालेय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा
By admin | Updated: August 6, 2016 00:23 IST