शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत राज्यस्तरीय दिगंबर जैन संमेलनात ५०० भावी वधू-वरांचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:44 IST

अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सैतवाल दिगंबर जैन वधू-वर परिचय संमेलनात जवळपास २०० युवक व ३०० युवतींनी आपला परिचय करुन दिला. उद्योजक किंवा व्यापारी नवराही चालेल, असा कल या संमेलनात युवतींमध्ये दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय सैतवाल दिगंबर जैन वधू-वर परिचय संमेलनात जवळपास २०० युवक व ३०० युवतींनी आपला परिचय करुन दिला. उद्योजक किंवा व्यापारी नवराही चालेल, असा कल या संमेलनात युवतींमध्ये दिसून आला.औरंगाबाद येथील संत तुकाराम नाट्यगृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन रिसोड येथील उदयकुमार जोगी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुंबई येथील महावीर घोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून महामंत्री रमेश रणदिवे, अध्यक्ष जिनदास मोगले, मुख्य प्रवर्तक मंगलाताई गोसावी, कार्याध्यक्ष दिगंबरराव वायकोस, विलास जोगी, गणेश खोबरे, राहुल जोगी आदींची उपस्थिती होती.आचार्य आर्यनंदीजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने संमेलनास प्रारंभ झाला. प्रारंभी या वधू-वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष जिनदास मोगले व पाहुण्यांनी संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश सांगून राज्यभरातून आलेल्या युवक, युवतींसह त्यांच्या पालकांचे स्वागत केले व जास्तीत जास्त विवाह जुळून यावेत, यासाठी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर बोलावून युवक व युवतींनी आपला परिचय करुन दिला. त्यामुळे रेशीमगाठी जुळण्याची ‘लगीनघाई’ दिवसभर येथे दिसली.काही युवकांनी घर, आई-वडिलांचा सांभाळ करणारी अनुरुप भावी पत्नी असावी तर काहींनी नोकरीवाली व उच्चशिक्षित युवतींना पसंती दर्शविली. काही युवतींनी निर्व्यसनी, व्यापारी, धार्मिक तर काही युवतींनी उच्चशिक्षित व नोकरीवाल्या भावी पतीला पसंती दाखविली. व्यापारी किंवा उद्योजक पतीला प्रथमच युवतींनी पसंती दर्शविली, हा चांगला बदल यावेळी दिसला. यामुळे हा मेळ जमविण्यासाठी आलेल्या युवक, युवतींसह पालक एकमेकांच्या भेटीगाठी घेत होते. कार्यक्रमासाठी परिचय संमेलनाच्या पदाधिकाºयांसह शोभाताई देशमाने, ज्योती मोगले, ऋषाली जोगी, संदीप वायकोस, सतीश जोगी, ममता अंबेकर, मीनाक्षी उदगीरकर, अजय वायकोस आदींनी परिश्रम घेतले. अ.भा. दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्टÑीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांनी भावी वधू-वरांना शुभेच्छा देऊन जास्तीत जास्त विवाह लावण्याचे आवाहन केले. कार्याध्यक्ष डी.डी. वायकोस यांनी आभार मानून आगामी संमेलनात जास्तीत जास्त विवाह जुळवून साधेपणाने लग्नसोहळे साजरे करण्याचे आवाहन केले.