शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शिवसेनेने घेतल्या मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 19:27 IST

२०१४ साली झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेला ११ जागा मिळाल्या.

ठळक मुद्देविद्यमानांना बोलावले नाही इच्छुक शिवसेना भवन परिसरात 

औरंगाबाद : विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेने मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती रविवारी दिवसभर मुंबईतील शिवसेना भवन येथे घेतल्या. विभागातील ४६ जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. काही जागांसाठी प्रतिसाद मिळाला तर काही जागांवर उमेदवार शोधावा लागेल, अशी परिस्थिती रविवारी समोर आली. 

२०१४ साली झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेनेला ११ जागा मिळाल्या. त्यानंतर ३ जागा इतर पक्षांतील आमदारांनी प्रवेश केल्यामुळे वाढल्या. भाजपसोबत युती झाल्यानंतर मराठवाड्यातील किती जागा शिवसेनेच्या पदरात पडणार हे अद्याप ठरलेले नाही. परंतु सर्व जागांसाठी मुलाखती घेऊन पक्ष ताकदीचा आढावा आज घेण्यात आला. मराठवाड्यानंतर विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 

रविवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. जालन्यातील ५ आणि औरंगाबादेतील ९, अशा १४ जागांसाठी मुलाखती झाल्या. उर्वरित जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत. औरंगाबाद शहरातून पूर्व मतदारसंघातून विधानसभा संघटक राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी यांनी, पश्चिममधून माजी नगरसेवक बन्सीलाल गांगवे, नगरसेवक मनोज गांगवे यांनी, मध्य मतदारसंघातून माजी आ.प्रदीप जैस्वाल, बंडू ओक, सुहास दाशरथे, बाळासाहेब थोरात, राजेंद्र जंजाळ आदींनी मुलाखती दिल्या. औरंगाबाद ग्रामीणमधून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, संतोष माने, दिनेश मुथा, वैजापूरमधून प्रा.रमेश बोरणारे, आसाराम रोेटे, प्रकाश चव्हाण यांनी, सिल्लोड, पैठण, पश्चिम मतदारसंघांतून विद्यमान आमदार मुलाखतीसाठी आले नाहीत. कन्नडमधून उदयसिंह राजपूत, डॉ.अण्णा शिंदे यांनी तर फुलंब्रीतून विधानसभा संघटक बाबासाहेब डांगे, रमेश पवार, जिजा कोरडे आदींनी मुलाखती दिल्या.

प्रती इच्छुक तीन हजारप्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखांनी दिलेला पास मुलाखत देण्यासाठी गेलेल्या इच्छुकांकडे होता. प्रत्येक इच्छुकाला सदस्यत्व शुल्कापोटी १ हजार आणि मुलाखती शुल्क २ हजार असे तीन हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. १० ते १२ मिनिटे प्रत्येकासाठी मिळाले.

विद्यमानांना बोलावले नाही पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान आ.संजय शिरसाट, पैठणचे आ.संदीपान भुमरे, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार हे मुलाखतीसाठी नव्हते. याप्रकरणी आ.शिरसाट यांनी सांगितले, विद्यमान आमदारांसाठी मुलाखती नव्हत्या. इच्छुकांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मराठवाड्यात हदगाव, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर, वसमत, परभणी, जालना, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, उमरगा या जागांवर शिवसेनेचे उमेदवार २०१४ साली विजयी झाले होते. 

जागा वाटपावरून वादाची शक्यताजालन्यातील बदनापूरमधून २०१४ साली भाजपने बाजी मारली होती. त्यामुळे यावेळी शिवसेनेला तो मतदारसंघ मिळणार की नाही, यावरून वाद होऊ शकतो. औरंगाबादमध्ये मध्य, गंगापूर येथील जागा वाटपावरून वाद होऊ शकतात. भाजपकडे असलेले काही मतदारसंघ सेनेला हवे आहेत. सेनेचा जिथे पराभव अटळ आहे, अथवा यापूर्वीच विजय मिळालाच नाही, ते मतदारसंघ भाजपला हवे आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMarathwadaमराठवाडाvidhan sabhaविधानसभा