शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये दक्षतेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 13:46 IST

शहरात रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल सोशल मिडीयावरून अफवा पसरू नये म्हणून आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

औरंगाबाद : शहरात रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल सोशल मिडीयावरून अफवा पसरू नये म्हणून आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मोठ्याप्रमाणावर झालेल्या हिंसाचारामागे किरकोळ कारण असले तरी याबाबत सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरून इतर ठिकाणी हिंसाचार पसरू नये म्हणून पोलिसांकडून ही दक्षता घेण्यात आली आहे. 

शुक्रवार मध्यरात्रीपासून शहरातील मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजार भागात तणाव होता. यातून झालेल्या हिंसाचाराने अचानक रोद्रूप धारण केले. यातून रात्रभर या भागात जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांच्या माहितीनुसार हिंसाचारामागे किरकोळ कारण होते मात्र जमाव आक्रमक झाल्याने मोठ्याप्रमाणावर हिंसाचार झाला. यामागे सोशल मिडियामधून पसरविण्यात आलेल्या अफवांचा मोठा हात असल्याचा संशय आहे.

यादरम्यान  शहराच्या इतर भागात शांतता होती. आज सकाळी याबाबत सोशल उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. हिंसाचाराचे फोटो, माहिती, बातम्या व्हायरल झाल्या. यामाध्यमातून परत एकदा शहरात अफवा पसरून इतर ठिकाणी याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून पोलिसांनी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. 

सध्या हिंसाचार झालेल्या भागात शांतता असून येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पोलिसांची मोठी कुमकही या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. हिंसाचार भडकला तो अफवांमुळे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका असे पोलीस प्रशासना व लोकप्रतिनिधींकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारSection 144जमावबंदीshahaganjशहागंजAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसInternetइंटरनेट