शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

आंतरराष्ट्रीय कार्गो हब होणार नोव्हेंबरमध्ये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:56 IST

बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कार्गो हब सुरूकरण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, सुरक्षा समितीची नुकतीच परवानगी मिळाली आहे. आगामी दीड ते दोन महिन्यांत ‘कस्टम’ अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन नोव्हेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देऔरंगाबाद विमानतळ : बियाणे, स्टील निर्यातीस मिळणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कार्गो हब सुरूकरण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, सुरक्षा समितीची नुकतीच परवानगी मिळाली आहे. आगामी दीड ते दोन महिन्यांत ‘कस्टम’ अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन नोव्हेंबर अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.मराठवाड्यातील डाळिंब, मोसंबी, द्राक्षे आदी कृषी उत्पादनांसह बियाणे, स्टील, औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरूकरण्याचा विचार पुढे आला. यासाठी परिसरातील भूसंपादन करण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव भारतीय विमान प्राधिकरणासह केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. सुरक्षा विभागाचा हिरवा कंदिल न मिळाल्याने दोन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांच्यासह काही उद्योजकांनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कार्गो सेवा प्रस्तावाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय नागरी सुरक्षा महामंडळाच्या अधिकाºयांनी भेट देऊन विमानतळ परिसराची पाहणी केली. विमानतळाच्या जुन्या इमारतीत तूर्तास कार्गो हब सेवा सुरूकरण्यास सुरक्षा विभागाची मंजुरी मिळाली आहे. कस्टम अधिकाºयांची या प्रकल्पाची सेवा सुरूकरण्यास आवश्यकता असल्याने या जागा भरणे आवश्यक आहे. याबाबत कस्टम विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विभागाकडून आगामी दीड ते दोन महिन्यांत कस्टम अधिकारी, कर्मचाºयांची भरती होण्याची शक्यता असून, नोव्हेंबरअखेर कार्गो हबमधून सेवा प्रत्यक्षात सुरू होऊ शकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\\केंद्रीय नागरी सुरक्षा महामंडळाकडून कार्गो हब सुरूकरण्याबाबत मंजुरी मिळाली आहे. नागपूर विभागाकडून कस्टम अधिकाºयांसह कर्मचाºयांची नियुक्ती होताच ही सेवा सुरूकरण्यात येणार आहे. आगामी दोन महिन्यांत ही प्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे.- डी. जी. साळवे, संचालक, औरंगाबाद विमानतळ प्राधिकरण

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळ