शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:07 IST

: येत्या २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत दुसरे इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : येत्या २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत दुसरे इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जगभरातील विविध बौद्ध राष्ट्रांतील प्रमुख भिक्खू व मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना भन्ते एम. धम्मज्योती थेरो म्हणाले की, जागतिक पातळीवर प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून औरंगाबाद शहराची ओळख निर्माण करून देणे, या परिसरातील अजिंठा, वेरूळ लेण्यांचा वारसा जोपासून येथे उद्योगधंद्यासाठी आंतरराष्ट्रीय दारे उघडी करून देणे, हा येथे इंटरनॅशनल फेस्टिव्हल आयोजित करण्यामागचा उद्देश आहे. यंदा या फेस्टिवलचे उद्घाटन श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या हस्ते होणार आहे.या माध्यमातून भारत व श्रीलंका या दोन्ही राष्ट्रांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक संबंध मजबूत होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत.विश्वविख्यात अजिंठा, वेरूळ आणि शहरातील बुद्धलेणीच्या संवर्धनासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना समारंभात निवेदन सादर केले जाणार आहे. संग्रामनगर उड्डाणपुलानजीक जंबिदा लॉन्सवर विशाल सभामंडपात आयोजित या फेस्टिव्हलमध्ये भदन्त खेमधम्मो महाथेरो, भदन्त बोधिपालो महाथेरो, भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो, भदन्त उपगुप्त महाथेरो, भदन्त यशका इरापाडल महाथेरो, भदन्त कुसल महाथेरो (म्यानमार), भदन्त आयुपाल महाथेरो (म्यानमार), भदन्त चंदिमा (बांगलादेश), भदन्त दीपवस, भदन्त कुवेन, भदन्त धनकाऊ (थायलंड), भदन्त आर्या प्रज्ञा, आर्या किम होग (व्हिएतनाम), भदन्त ला मा (थायलंड), भदन्त डॉ. एम. सत्यपाल आदींसह श्रीलंका येथील १० ते १५ भिक्खू सहभागी होणार आहेत. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी भिक्खू संघ, तसेच मनीष बागूल, प्रफुल्ल ढेपे हे कार्यवाह म्हणून परिश्रम घेत आहेत.