औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत होणाºया आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सायकल खेळाचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दयानंद कांबळे यांना सायकल संघटनेतर्फे गुरुवारी देण्यात आले. औरंगाबादसह पूर्ण मराठवाड्यातच राष्ट्रीय सायकलपटू आहेत. १२ वीपर्यंत हे खेळाडू सहभागी होत असतात; परंतु विद्यापीठातर्फे सायकल स्पर्धेचे आयोजन होत नसल्याने १२ वीनंतर त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सायकल खेळाचा समावेश करावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, उपाध्यक्ष हिरा सलामपुरे आणि सचिव चरणजितसिंग संघ यांनी निवेदनाद्वारे क्रीडा संचालक दयानंद कांबळे यांच्याकडे केली आहे.
सायकल खेळाचा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत समावेश करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:43 IST
औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत होणाºया आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सायकल खेळाचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे.
सायकल खेळाचा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत समावेश करावा
ठळक मुद्देसायकल संघटनेची मागणी : क्रीडा संचालकांना निवेदन