शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

मध्यवर्ती बँक संगणकीकृत

By admin | Updated: August 6, 2014 02:17 IST

नांदेड: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच ६९ शाखा संगणकीकृत झाल्या असून कोअर प्रणालीद्वारे व्यवहार सुरु झाले आहेत. याशिवाय

 

नांदेड: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच ६९ शाखा संगणकीकृत झाल्या असून कोअर प्रणालीद्वारे व्यवहार सुरु झाले आहेत. याशिवाय आरटीजीएस, एनईएफटी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कोणत्याही शाखेतून व्यवहार करता येत असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. एस. कदम यांनी दिली.सहकार आयुक्त व निबंंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी बँकेचे तत्त्कालीन संचालक मंडळ १९ मार्च २००५ रोजी निष्प्रभावित करुन बँकेवर प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे बँकींग व्यवसाय करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेकडून १ मार्च २०१२ रोजी परवाना मिळाला. तर ७ जानेवारी २०१३ रोजी बँकेवरील रिझर्व बँकेचे अर्थिक निर्बंध पूर्णपणे उठले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भागभांडवल ५०.२३ कोटी असून ३१६ कोटींची जमा ठेव झाली आहे. यावरुन बँकेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिसते.या सुविधेमुळे कोणत्याही शाखेतील खातेदारास कुठल्याही शहरातील शाखेमधून व्यवहार करता येत आहे. आरटीजीएस , एनईएफटी या सुविधामुळे मध्यवर्ती बँकेतून इतर कोणत्याही बँकेत रक्कम वर्ग करता येते. ग्रामीण भागातील शेतकरी, सभासद संस्था, ग्राहक व ठेविदारांना बँकेच्या माध्यमातून तत्पर सेवा मिळत आहे. नाबार्डकडून राबविण्यात येणाऱ्या कोअर बँकिंग प्रणालीचा स्विकार करुन बँकेने जिल्ह्यातील गारपीटग्रस्त १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना शासनाकडून प्राप्त अनुदान तत्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहे. गत सात वर्षांत बँकेने चागंली प्रगती केलेली आहे. मार्च २००७ मध्ये ग्रॉस एनपीए (अनुत्पादित कर्ज) ५६२.७० कोटी होते, तर मार्च २०१४ मध्ये २०३ कोटीवर आले आहे. याचे टक्केवारीचे प्रमाण ८७.९५ टक्क्यांवरुन ३५.७९ टक्क्यांवर आले. नेट एनपीए ७८.९५ वरुन ० टक्यावर आला. एनपीएसाठी २००७ मध्ये २७४.३७ कोटीची तरतूद केली होती तर आज २२२.९८ कोटी आहे. २००७ मध्ये निव्वळ नक्त मूल्य नेटवर्थ वजा ३२५.७२ कोटी होते.तर सध्या प्लस २५.६५ कोटी झाले आहे. भांडवल पर्याप्तता निधीचे प्रमाण मायनस ८६.१७ टक्यावरुन प्लस ८.१४ टक्यावर आले. तर थकबाकीचे प्रमाण ५५२.१७ कोटीवरुन २१९.१४ कोटीवर आले आहे. संचित तोटे ३६९.४० कोटीवरुन १३९.६० कोटींवर आले आहेत. (प्रतिनिधी)