शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१६१ कोटींच्या रकमेवर २०० कोटींचे व्याज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:03 IST

औरंगाबाद : नवीन पाणी पुरवठा योजनेत महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून ६३३ कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. २००९ मध्ये केंद्र ...

औरंगाबाद : नवीन पाणी पुरवठा योजनेत महापालिकेला स्वत:चा वाटा म्हणून ६३३ कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. २००९ मध्ये केंद्र शासनाने १४३ कोटी तर राज्य शासनाने २०११ मध्ये मनपाला समांतर जलवाहिनीसाठी १८ कोटी रुपये दिले होते. १६१ कोटींच्या या अनुदान रकमेवर १० वर्षांत तब्बल २०० काेटी रुपये व्याज जमा झाला आहे. मनपाकडे ३५० कोटी रुपये उपलब्ध आहेत. शासन मंजुरी घेऊन ही रक्कम नवीन पाणी पुरवठा योजनेत टाकण्याचा विचार मनपा प्रशासन करीत आहे.

महाराष्ट्र शासनाने शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली. योजनेतील पहिल्या टप्प्याचे १३०८ कोटी रुपयांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या योजनेत महापालिकेला सुमारे ६३३ कोटी रुपयांचा वाटा टाकावा लागणार आहे. आधीच स्मार्ट सिटी योजनेत मनपाला २५० कोटी रुपयांची जुळवाजुळव करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. महापालिकेने वाटा टाकल्याशिवाय पुढील निधी मिळणार नाही, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतल्यामुळे जुलै महिन्यात सुमारे ७० कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटी योजनेसाठी दिला जाईल, असे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे. उर्वरित निधीसाठी स्वतंत्र खाते सुरू करण्यात आले असून, त्यात महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या निधीचा प्रश्‍न मार्गी लागला असला तरी प्रशासनाला चिंता आहे ती १६८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील ६६३ कोटींच्या हिश्श्याची. समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीतील मूळ व व्याजाचे सुमारे ३५० कोटी वापरण्यात यावेत, असा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.

--------------

२०० कोटींचे व्याज

समांतर जलवाहिनीच्या योजनेसाठी ३ नोव्हेंबर २००९ रोजी केंद्राकडून पहिल्या टप्प्यात १४३.८७ कोटी रुपये तर राज्य शासनाकडून ४ मे २०११ रोजी १७.९४ कोटी असे १६१.८१ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झालेले होते. ही रक्कम महापालिकेने बँकेत ठेवली आहे. त्यावर आतापर्यंत सुमारे २०० कोटी रुपयांचे व्याज जमा झाले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने योजनेचे काम करणाऱ्या तत्कालीन औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला गतवर्षी २९ कोटी रुपये दिले आहेत.