शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना उद्योगासाठी चार टक्के दराने व्याज; अर्ज केला का?

By विजय सरवदे | Updated: February 29, 2024 18:20 IST

महिला समृद्धी कर्ज योजना : बचत गटातील महिला उद्योजक लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर : बचत गटांच्या महिलांना व्यावसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून ‘महिला समृद्धी कर्ज योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अल्प व्याजदराने ५ लाखांपासून जास्तीत जास्त २० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त बचत गटांच्या महिलांनी सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करायचे आहेत.

बचत गटातील मागासवर्गीय महिला उद्योजकच या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन देण्याचा या योजनेचा हेतू आहे. योजनेंतर्गत कर्जाची परतफेड कालावधी हा तीन वर्षांचा आहे.

१) काय आहे महिला समृद्धी योजना?मागासवर्गीय अथवा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला बचत गटांंना व्यावसाय किंवा उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून महिलांसाठी महिला समृद्धी योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिला व्यावसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील मागासवर्गीय महिलांना आर्थिक मदत दिली जाते.

२) चार टक्के दराने मिळते कर्जमहिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत उद्योग, व्यावसाय सुरू करण्यासाठी लाभार्थी महिला बचत गटांना ४ टक्के व्याज दराने ५ लाखांपासून जास्तीत जास्त २० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

३) निकष काय?लाभार्थी हा मागासवर्गीय अथवा अनुसूचित जातीचा असावा. महिला लाभार्थ्यांचे किमान वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असावे, लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असावेत, अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी ९८ हजारांपर्यंत, तर शहरी भागासाठी १ लाख २० हजारांपर्यंत असावे.

४) कागदपत्रे काय लागतात?या कर्ज योजनेसाठी लाभार्थीचे जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी पुरावा (वीजबिल किंवा रेशनकार्ड), मतदार ओळखपत्र, बचत गटाचे ओळखपत्र आदी कागदपत्रे गरजेची आहेत.

सूचना प्राप्त झालेल्या नाहीतबचत गटांच्या महिलांना कर्ज वाटपाची महिला समृद्धी योजना ही योजनेविषयी अद्याप जिल्हा समाज कल्याण कार्यालयास सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे या कार्यालयांच्या सूत्रांनी सांगितले आहे.

टॅग्स :bankबँकWomenमहिला