शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्च २०१५ पर्यंत एकात्मिक राज्य जल आराखडा तयार होणार!

By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST

औरंगाबाद : येत्या ३१ मार्च २०१५ पर्यंत एकात्मिक राज्य जल आराखडा तयार करावा, त्यासाठी जल मंडळाच्या बैठका वारंवार व्हाव्यात

औरंगाबाद : येत्या ३१ मार्च २०१५ पर्यंत एकात्मिक राज्य जल आराखडा तयार करावा, त्यासाठी जल मंडळाच्या बैठका वारंवार व्हाव्यात, मुख्य सचिवांनी याबाबतचे गांभीर्य सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत ठरविण्यात आले असल्याची माहिती आज येथे एका पत्रपरिषदेत मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीचे संयोजक प्रदीप पुरंदरे यांनी एका पत्रपरिषदेत सांगितले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ अन्वये जल परिषदेची स्थापना २००५ साली झाली. मुख्यमंत्री तिचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत; पण गेल्या दहा वर्षांत परिषदेची एकही बैठक घेण्यात आली नव्हती. परिषद कार्यरत नव्हती. राज्य जल परिषद कार्यरत करावी व तिची पहिली बैठक ताबडतोब घेण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीने केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेतली आणि अलीकडेच १७ जानेवारी रोजी राज्य जल परिषदेची पहिली बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी समितीचे सदस्य असलेले मंत्री व संबंधित अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा जायकवाडीस लागू नाही आणि त्या कायद्याने डेलिनिएशन केल्याशिवाय जायकवाडीस कलम क्र. १२ (६) (ग) प्रमाणे पाणी देता येणार नाही, अशा अर्थाचे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे मूळ प्रतिज्ञापत्र कसे चूक आहे आणि त्या भूमिकेमुळे कशी हास्यास्पद परिस्थिती राज्यात निर्माण होईल, हे आपण दाखवून दिले. खुद्द मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हा मुद्दा उचलून धरला, याकडे लक्ष वेधून पुरंदरे यांनी आणखी सांगितले की, परिणामी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष बुद्धिराजा यांची पूर्वीची भूमिका चूक होती. आता ती भूमिका नाही, असा खुलासा केला. म.ज.नि.प्रा. कायदा जायकवाडीलाच नव्हे, तर सर्व महाराष्ट्राला लागू आहे. नदीखोरे स्तरावरील पाण्याचे समन्यायी वाटप आणि एमएमआयएसएफ कायदा याचा काहीही संबंध नाही.सिंचनविषयक विविध कायद्यांबाबतच्या सर्व औपचारिक प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला, अशी माहिती त्यांनी दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात पुरंदरे यांनी, केळकर ही प्रवृत्ती आहे. त्यांच्या मताला आज महत्त्व आहे, या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. या पत्रपरिषदेस साथी अण्णा खंदारे, भाऊ शिंदे, सुखदेव बन आदींची उपस्थिती होती.